अशा प्रकारे मिळवा स्मार्टफोनच्या व्यसनापासून सुटका ; जाणून घ्या लक्षणे, मानसिक आणि शारिरीक समस्या

नवी दिल्ली : आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जमान्यात स्‍मार्टफोनचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. तासन तास मोबाइल आणि टॅबलेट सारख्या उपकरणांवर सर्फिंग करण्याची अनेक लोकांची सवयच बनली आहे. स्‍मार्टफोन आपल्या जीवनातील अत्यावश्यक गोष्ट बनली असून त्याच्याशिवाय आपली अनेक कामे अडू शकतात. स्मार्टफोन वर पबजी खेळण्याचे प्रमाणही प्रचंड प्रमाणात वाढत आहे. परंतु स्मार्टफोनवर पबजी खेळण्याच्या घातक दुष्परिणामासंदर्भात मनोविकार तज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे. पबजीचे जडणारे व्यसन अन्य नशेच्या पदार्थांमुळे जडणाऱ्या व्यसनाइतकेच घातक आणि प्रसंगी जीवघेणे असल्याचे मनोविकार तज्ञांनी सांगितले.

मागील आठवड्यात तामिळनाडूमध्ये टिकटॉकवर व्हिडीओ न बनवू दिल्यामुळे २४ वर्षांच्या एका आईने आत्महत्या केल्याची घटना तसेच मध्यप्रदेश मध्ये मागील महिन्यात सलग ६ तास पबजी खेळल्याने फिट येऊन एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. यानंतर मनोविकार तज्ञांनी हा इशारा दिला होता. स्मार्टफोनच्या वापरासंदर्भात आणि व्यसनासंदर्भात खालील माहिती आणि महत्वपूर्ण सल्ले तज्ज्ञांनी दिले आहेत :

काय आहेत स्मार्टफोन व्यसनाची लक्षणे :
– मनोविकारतज्ज्ञांनी सांगितलेल्या माहितीनुसार डिजिटल उपकरणांचे व्यसन लागलेले लोक सारखे या उपकरणांच्या बाबतीतच विचार करत असतात.
-जेव्हा त्यांना या उपकरणांपासून लांब राहावे लागते तेव्हा त्यांची प्रचंड चिडचिड होते.
-तुम्ही डिजिटल उपकरणांच्या व्यसनाधीन असाल तर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनापासून दूर जात असता.
-अनेक लोक अशा वेळी समाज आणि आपल्या परिवारातील लोकांशी बोलणेदेखील बंद करतात.
-अशा कित्येक घटनांमध्ये लोक आपले नियमित काम देखील करणे बंद केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
-अशा लोकांमध्ये डिप्रेशन, चिंता, अनिद्रा, चिड़चिडेपण यात वाढ होतेच याचबोबर अन्य गोष्टींवरदेखील लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येतात.

काय करावे या व्यसनापासून लांब राहण्यासाठी :
– तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार स्मार्टफोनच्या या व्यसनाशी लढण्याची पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी म्हणजे यासंदर्भात स्वतःला होणारी जाणीव गरजेची आहे.
– लोकांना आपले ऑफिस, घरातील किव्वा बाहेरील काम, मनोरंजन आणि इतर गोष्टींमध्ये संतुलन राखता येणे आवश्यक आहे ते संतुलन राखावे.
– रोज आवश्यक तेवढी झोप घेण्याकडेदेखील लक्ष देणे गरजेचे आहे.
– प्रत्येक प्रौढ व्यक्तीने प्रत्येक आठवड्यात कमीत कमी चार तास डिजिटल उपकरणांपासून स्वतःला दूर ठेवावे.
– असे करण्यात अडचणी येत असतील तर तर हि गोष्ट मात्र चिंताजनक आहे.

पालकांनी पाल्यांना कसे प्रवृत्त करावे :
– लोकांना जेव्हा त्यांचे मूल मोबाईल किंवा कॉम्पुटर च्या स्क्रीन वर जास्त वेळ घालवताना आढळून येईल तेव्हा सर्वात आधी त्याच्याशी चर्चा करायला हवी.
– मुलांना जास्त वेळ हि उपकरणे वापरण्याचे दुष्परिणामी समजून सांगून यांचा वापर कमी करण्यास सांगायला हवे.
– मुलांना घरातच व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते अशा उपासनाच्या अधीन होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे मुलांना मैदानी आणि शारीरिक खेळ खेळासाठी प्रोत्साहन द्यावे.
– शक्य झाल्यास पाल्यांनी मुलांसोबत शारीरिक खेळात सहभागी व्हावे.
– याचबरोबर पालकांनी मुलांसमोर मोबाईल अथवा इतर डिजिटल उपकरणांचा वापर कमी करावा म्हणजे मुले त्याचे अनुकरण करतील.
– एवढे करूनही आणि अनेकवेळा सांगूनदेखील तुमचे पाल्य ऐकत नसेल आणि काही फायदा होत नसेल तर त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाणे फायदेशीर ठरेल.

हे झाले मानसिक समस्यांबाबत परंतु स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे होणाऱ्या काही शारीरिक समस्या देखील आहेत.

स्मार्टफोनच्या अधिक वापराणे होणाऱ्या ‘शारिरीक’ समस्या :

मानेच्या समस्या :
स्‍मार्टफोन च्या वापरासाठी तुम्हाला मान झुकवावी लागत असल्याने स्वाभाविकपणे मानेचे दुखणे उद्भवते. जास्त वेळ मानेवर जोर देणे आणि एकाच अवस्थेत ठेवणे हानिकारक होऊ शकते. याने मानेच्या स्नायूंवर वाईट प्रभाव पडतो. जास्त वेळ स्नायूंना आराम न मिळाल्यास मानेचे दुखणे उदभवते.

बोटांचे दुखणे :
स्मार्टफोन वापरताना अंगठा आणि तर्जनी या बोटांचा जास्त वापर होतो. त्यामुळे बोटांमध्ये दुखणे सामान्य समस्या आहे. पण हे दुखणे वाढून बोटांमध्ये ताठरता आणि बोटे आखडण्याची समस्या होऊ शकते.

खांद्याचे दुखणे :
जास्त वेळ हातात फोन घेऊन त्याचा वापर केल्याने खांद्यांच्या स्नायूंमध्ये देखील ताण आणि आखडण होऊ शकते. यामुळे खांद्याचे दुखणे उद्भवून दैनंदिन कामे करण्यातदेखील अडचणी उत्पन्न होऊ शकतात.

पाठीचे दुखणे :
स्मार्टफोन वापरताना तुमच्या मानेबरोबरच पाठदेखील झुकलेली असते. जास्त काळासाठी पाठ वाकल्यामुळे तिचे दुखणे वाढू शकते. यापासून वाचण्यासाठी तुम्ही काळजी गरजेचे आहे.

डोळ्यांचे दुखणे :
स्मार्टफोनच्या अधिकच्या वापरामुळे तुमच्या डोळ्यामध्ये दुखणे, जळजळ, इत्यादी अनेक समस्यादेखील निर्माण होतात. यामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा येतो. त्यामुळे जर तुम्हाला दिवसभर स्क्रीन वर काम करावे लागत असेल तर मधून मधून ब्रेक घेणे गरजेचे आहे.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक