वजन वाढत नाही तर Weight Loss मध्ये मदत करते गावठी तूप, असा करा वापर

नवी दिल्ली : जर योग्य प्रमाणात गायीचे गावठी तूप वापरले तर हे निश्चित मात्रेत वेट लॉसमध्ये मदत करते. तूपाचा आहारात समावेश केल्याने ते जेवणाचा ग्लायसिमिक इंडेक्स कमी करते. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वेगाने वाढत नाही. तुम्ही डाळ-भात, चपातीसोबत, खिचडी, दाल-बाटी किंवा पूरण पोळीसोबत सुद्धा 1-2 चमचे तूप वापरू शकता. परंतु, वजन कमी करण्यासाठी तूपाचा वापर असा करा…

1. दूधासोबत तूप –
जेव्हा जेवण योग्यप्रकारे पचन होत नाही तेव्हा पोटात गॅस आणि पोटदुखीसह वजनसुद्धा वाढते. आयुर्वेदानुसार, 1 ग्लास गरम दूधात 1 चमचा तूप टाकून प्यायल्याने बद्धकोष्ठताची समस्या दूर होते. पचन चांगल्या पद्धतीने होऊन वजन कमी करण्यास मदत होते.

2. गरम पाण्यासोबत तूप –
वेट लॉससाठी सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास गरम पाण्यात 1 चमचा तूप मिसळून पिऊ शकता. असे केल्याने मेटाबॉलिज्मची प्रक्रिया जलद होते आणि वजन कमी करणे सोपे होते. याशिवाय स्किन सुद्धा सॉफ्ट आणि ग्लोइंग होते, तसेच सांधेदुखीची समस्या होत नाही.

यामध्ये काहीच शंका नाही की, भरपूर पोषकतत्व असलेले तूप आरोग्यासाठी लाभदायक आहे आणि वेट लॉसमध्ये सुद्धा उपयोगी आहे. परंतु जर जास्त प्रमाणात तूपाचे सेवन केले गेले तर हाय सॅच्युरेटेड फॅट भरपूर असलेले तूप नुकसानकारक सुद्धा ठरू शकते. यासाठी रोज 1 ते 2 चमच्यापेक्षा जास्त तूप सेवन करू नका.