‘या’ कारणाने शाहरुख खानला डॉक्टरेट देण्यास केंद्राचा विरोध 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शाहरुख खानला मानद डॉक्टरेट देण्यास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नकार दिला आहे. जमिया विद्यापीठाकडून शाहरुखच्या नावाचा प्रस्ताव मंत्रालयाला दिला होता.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, जमिया विद्यापीठाने शाहरूख डॉक्टरेट स्विकारण्याविषयी प्रस्ताव दिला होता. त्याने हा सर्वोच्च सन्मान समजून ई-मेल करून डॉक्टरेट स्विकारण्यास होकार दिला होता. त्यानंतर विद्यापीठाकडून शाहरुखच्या नावाचा प्रस्ताव मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पाठविण्यात आला होता. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने तो प्रस्ताव फेटाळून लावला आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याच विद्यापीठातून शिकला आहे.

या कारणाने डॉक्टरेट देण्यास विरोध
मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दु विद्यापीठाकडून शाहरूखला मानद डॉक्टरेट पदवी देण्यात आली आहे. हे कारण देत मंत्रालयाने परवानगी नाकारली आहे. अशा प्रकारचा कोणताही नियम नसतानाही शाहरुखला डॉक्टरेट देण्यास विरोध होत आहे. आज बॉलिवूड मध्ये असलेला किंग खान म्हणजेच शाहरुख खान १९८८-९० मध्ये जमिया विद्यापीठात मास कम्युनिकेशन रिसर्च सेंटरमध्ये शिकत होता. उपस्थिती कमी असल्याने तो अंतिम वर्षाची परीक्षा देऊ शकला नव्हता. २०१८ मध्ये शाहरूख खानची बॉक्स ऑफिसवर जादू काही चालली नाही. मागीलवर्षी प्रदर्शित झालेला ‘झिरो’ बिग बजेट चित्रपट दणकून आपटला होता.