Hruta Durgule | ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री ठरली सर्वाधिक फॉलोवर्स असणारी पहिली मराठी अभिनेत्री..
पोलीसनामा ऑनलाईन टीम – मराठमोळी हृता दुर्गुळेला (Hruta Durgule) लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. हृता फुलपाखरू या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. फुलपाखरू (Phulpakharu) या मालिकेतून खऱ्या अर्थानं तिला प्रसिद्धी मिळाली. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. तसेच ती (Hruta Durgule) सोशल मीडियावर नेहमीच लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
हृता दुर्गुळेचा महाराष्ट्रामध्ये चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. ती सध्या तरूणाईच्या गळ्यातील ताईत बनलं असल्याच म्हटलं जातंय. या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रसिदधीत मात्र दिवसेंदिवस भर पडतोय. तिच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याच दिसत आहे. सध्या ती ‘मन उडू उडू झालं (Man Udu Udu Jhala)’ या मालिकेमध्ये काम करत आहे. या मालिकेमध्ये तिनं दीपिका हे पात्र साकारलं आहे. तिची ही मालिकासुद्धा अगदी अल्पवेळातच लोकप्रिय झाली.
दरम्यान, हृता (Hruta Durgule) सोशल मीडियावर चाहत्यांचा संपर्कात येण्यासाठी कोणतीच संधी सोडत नाही. तिनं सगळ्या मराठी इंन्डस्ट्रीमधील अभिनेत्र्यांना आता टक्कर दिली आहे. ती इंन्टाग्रामवर (Hruta Durgule Instagram Account) सर्वाधिक जास्त फॉलोवर्स असणारी अभिनेत्री ठरली आहे.
तिचे इंन्टाग्रामवर एकूण 2.4 मिलियन इतके फॉलोवर्स झाले आहे.
त्यामुळं ती सध्या सर्वाधिक फॉलोवर्स असणारी पहिली मराठी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
https://www.instagram.com/p/CaNgTnFgMTj/?utm_source=ig_web_copy_link
Web Title :- hruta durgule becomes first marathi actress to have millions of followers on instagram man udu udu fame hruta durgule news
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Maharashtra Budget-2022 | दिलासादायक अर्थसंकल्प ! पुणे व्यापारी महासंघाकडून अर्थसंकल्पाचे स्वागत
Pune Crime | निर्लज्जपणाचा कळस ! पुतण्यानेच केला चुलतीवर बलात्कार; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना
Police Suspended | विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या 3 पोलिसांसह 1 होमगार्ड निलंबित