Maharashtra Budget 2022 | पुण्यातील वाहतूक, आरोग्य सेवेला अर्थसंकल्पात प्राधान्य ! छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी 250 कोटींची तरतूद स्वागतार्ह निर्णय – माजी आमदार मोहन जोशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Budget 2022 | पुण्याजवळ इंद्रायणी मेडिसिटीची (Indrayani Medicity in Pune) उभारणी आणि रिंगरोडसाठी (Pune Ring Road) भरीव तरतूद करून आणि मेट्रो मार्गांना (Pune Metro Route) चालना देण्याचा संकल्प राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला असून स्वागतार्ह निर्णय घेतले आहेत, अशी प्रतिक्रिया माजी आमदार, प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी व्यक्त केली आहे. (Maharashtra Budget 2022)

 

इंद्रायणी मेडिसिटीसाठी ३०० एकर जागा उपलब्ध केली जाणार असून सर्वच उपचार एकाच ठिकाणी असलेली ही देशातील पहिली वसाहत असेल. अनेक रुग्णांना ही वसाहत दिलासा देईल असा विश्वास आहे, असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे.

 

पुण्यातील तीन मेट्रो मार्ग आणि विस्तारीत मार्गांच्या कामाला चालना देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
पुणे रिंगरोड प्रकल्पासाठी १ हजार ५०० कोटींची तरतूद केली आहे.
पुण्याच्या वाहतूक प्रश्नाची सोडवणूक करण्याचा भरीव प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केला आहे, असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे. (Maharashtra Budget 2022)

छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या स्मारकासाठी २५० कोटींचा निधी दिला जाणार आहे.
या तरतुदीतून भव्य आणि प्रेरणादायी स्मारक उभे राहील, असे मोहन जोशी यांनी म्हटले असून या निर्णयाचे स्वागत केले आहे.

 

सीएनजीच्या दरात सवलत दिल्याने सीएनजीचा (CNG) वापर करणारे वाहनचालक, आणि घरगुती ग्राहक यांना अर्थमंत्र्यांनी दिलासा दिला आहे.
सध्याच्या महागाईच्या काळात अशा निर्णयाची गरज होती, असे मोहन जोशी यांनी नमूद केले आहे.

 

Web Title :- Maharashtra Budget 2022 | Priority in budget for transport and health services in Pune Provision of Rs 250 crore for Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial is a welcome decision Former MLA Mohan Joshi

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा