10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेबाबत सरकारने केला खुलासा, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आता तोंडावर आलेल्या बोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचे काय होणार ? याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचेही लक्ष लागले आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहावी आणि बारावी परीक्षांबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात परीक्षांबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

वर्षा गायकवाड यांनी व्हिडिओ ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. त्यात म्हटले आहे की, 10 वी आणि 12 वी परीक्षेच्या काळातच कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढत होत आहे. त्यामुळे मी विद्यार्थी प्रतिनिधी, सर्वपक्षीय प्रतिनिधी, तज्ज्ञ, पालक, शिक्षक आणि इतर क्षेत्रातील तज्ज्ञांशी पर्याय शोधण्यासाठी चर्चा करत आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना आणि पालाकांना आश्वस्त करू इच्छिते की, आपली सुरक्षा सर्वोच्च प्राथमिकता आहे. आम्ही परिस्थितीची पाहणी करत असून परीक्षासंदर्भात येत्या काही दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे त्या म्हणाल्या.