शाहीर अमर शेख चौकातील मोठा फ्लेक्स कोसळुन 2 ठार ; 6 गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

जुना बाजाराजवळील शाहीर अमर शेख चौकातील मोठा फ्लेक्स कोसळला असून 2 जण ठार झाले आहेत तर, 5 ते 6 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अनेक अ‍ॅटो रिक्षांचे मोठे नुकसान झाले असुन अग्‍नीशमन दलाच्या 3 गाडया घटनास्थळी रवाना झाल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी तिघे ट्रामा आयसीयू मध्ये आहेत. तर आणखी तीन ते चार हे जखमी आहेत अशी माहिती ससून हॉस्पिटलने दिली.या घटनेत आठ जण सापडले असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
[amazon_link asins=’B07B1B5CVK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’18f7768a-c880-11e8-9f1f-3fd7c331d355′]

शाहीर अमर शेख चौकामध्ये अनेक फ्लेक्स असून त्यावर मोठ-मोठया जाहिरातीचे होर्डिंग लावण्यात आलेली आहेत. त्यापैकी एक मोठा फ्लेक्स कोसळल्याची घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. फ्लेक्स अचानकपणे कोसळल्याने अनेक अ‍ॅटो रिक्षाचे नुकसान झाले आहे. फ्लेक्स कोसळुन शामराव गंगाधर कासार (वय 70 वर्ष, रा. पिंपळे गुरव, पुणे), शाम राजाराम धोत्रे (वय 45 वर्ष, रा. मदिना मापजेर, एम डी, देहूरोड कॅन्ट, पुणे) हे ठार झाले आहेत तर, शिवाजी देवदास परदेशी (वय 40 वर्ष, रा. 291 नाना पेठ, पुणे), किरण सोमनाथ ठोसर (वय 22 वर्ष, रा. गरड वस्ती, अनुसया बनकर, हडपसर), यशवंत   5 ते 6 जण गंभीर जखमी झाले आहेत.  गंभीर जखमी झालेल्यांना तात्काळ रूग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती अग्‍नीशमन दलाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. काही अ‍ॅटो रिक्षाचा चक्‍काचुर झाला आहे. उपलब्ध झालेल्या फोटोमध्ये सर्वकाही दिसत आहे. फ्लेक्स नेमका कशामुळे कोसळला हे समजु शकले नाही. मात्र, कोसळलेला फ्लेक्स जुना झाल्यामुळे तो कोसळला असावा असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B07CK51LT9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1e23777e-c880-11e8-a324-ef9bbbf37c96′]

गंभीर जखमी झालेल्यांची नावे अद्याप समजु शकलेली नाहीत. याबाबत पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी काही वेळापुर्वी फ्लेक्स कोसळल्याची घटना घडली आहे मात्र अद्याप अधिक माहिती उपलब्ध झालेली नसल्याचे सांगितले. दरम्यान, फ्लेक्स कोसळल्यामुळे शाहीर अमर शेख चौकातील वाहतुक खोळंबली आहे. चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावरील वाहतुक काही वेळासाठी वळविण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली आहे. वाहतुक शाखेच्या पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली असुन चौकाला जोडणार्‍या काही रस्त्यावरील वाहतुक वळविली आहे.

या दुर्घटनेत आईचे अंत्यसंस्कार करून येत असणाऱ्या 2 मुली आणि वडील हे रिक्षातून घरी येत असताना त्यांच्या रिक्षावर हे होर्डिंग पडले वडील गंभीर जखमी आहेत सर्वांना ससून मध्ये उपचारासाठी दाखल केले आहे

 

चेतन तुपे (विरोधी पक्ष नेते) :- मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेच्या जागेतील होर्डिंग कापायचे काम सुरू असताना ही दुर्घटना झाली. रेल्वेचे लोक हे होर्डिंग कापत होते. त्यामुळे रेल्वे वर कडक कारवाई झाली पाहिजे.

अरविंद शिंदे (काँग्रेस गटनेते) :- ठेकेदार आणि रेल्वेवर संध्याकाळ पर्यंत कडक कारवाई करण्यात यावी.

सदानंद शेट्टी (स्थानिक, माजी नगरसेवक) :- रेल्वे अधिकारी दोषी आहेत. ही दुर्घटना झाल्यावर ते पळून गेले आहेत.

 

Updated News

PUNE :- शाहीर अमर शेख चौकातील (जुना बाजार चौक) मोठा फ्लेक्स कोसळुन 3 ठार ; 7 गंभीर जखमी

३ मयत आणि ७ जखमींची नावे

पहा व्हिडिओ आणि वाचा सविस्तर