पिंपरी चिंचवड शहरात शंभर टक्के बंद 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

मराठा आरक्षणला पाठिंबा देण्यासाठी आज क्रांती दिनी सकल मराठा मोर्च्याच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला पिंपरी-चिंचवड शहरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. कोणत्याही अनुचित प्रकारशिवाय हा बंद यशस्वी झाला. मात्र पहाटे पासून ते रात्री उशिरा प्रयत्न शहरात कडक पोलीस बंदोबस्त होता.
[amazon_link asins=’B077PWK5QD’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’17788cf0-9bf1-11e8-b8e3-bb56082f4eed’]

पिंपरी-चिंचवड मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सकाळ पासून धरणे आंदोलन सुरु होती. या आंदोलनात येऊन सत्ताधारी पक्षासह सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आपली मनोगत व्यक्त करुन मराठा आरक्षणास पाठींबा दर्शविला. शहरात मोशी, निगडी, रावेत, डांगे चौक, वाकड, हिंजवडी, सांगवी, भोसरी,चिंचवड, भोसरी परिसरात आंदोलने करण्यात आली. पदयात्रा तसेच रॅली काढण्यात आली.

मराठा आरक्षण देण्यास चाल ढकल करणाऱ्या सरकारचा निषेध करण्यात आला. सकाळ पासून सायंकाळी उशिरा प्रयत्न शहरातील बाजारपेठा शंभर टक्के बंद होत्या. या बंदमुळे चाकरमाऱ्यांचे अतोनात हाल झाले. शहरातील बाजारपेठेत किंवा रस्त्यावर साधी चहाची टपरी देखील उघडी दिसत नव्हती. व्यापारी वर्गाने आपली दुकाने बंद ठेवून बंद शंभर टक्के यशस्वी केला.

चाकण परिसरात पुकारलेल्या दुपारच्या सुमारास हिसक वळण लागले. संतप्त जमावाने शोकडो वाहनांची तोडफोड केली तर २५ ते ३० वाहने पेटवून दिली. यामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी व प्रवाशी नागिरकही जखमी झाले. तबबल सात तासानंतर चाकणमधील तणावाची परिस्थिती हळू हळू निवळली. चाकण परिसरात संचारबंदी लावण्यात आली होती. कोल्हापुर परिक्षेत्र विभागाचे  विशेष पोलिस महानिरीक्षक  विश्वास नांगरे पाटील  यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी चाकण परिसरात दाखल झाले होते. पोलिसांनी या प्रकरणात सुमारे ५००० आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1df52a62-9bf1-11e8-bbae-036c625b4116′]

चाकण मध्ये झालेली घटना, परिस्थिती पाहता पोलिसांनी आगोदरच मोठा पोलीस फोर्स रस्त्यावर उतरवला होता. संशयित असणाऱ्यांना ताब्यात घेतले जात होते. तसेच पोलिसांची वेगवेगळी पथके परिसरात गस्त घालून सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवत होती. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील कंपन्या, शाळा, महाविद्यालये, पेट्रोल पंप, हॉटेल्स बंद ठेवण्यात आली होती. सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या असून प्रत्येकाला हद्दीत फिक्स पॉईंट दिले आहेत. महामार्ग, द्रुतगती महामार्ग, मुख्य चौक या ठिकाणी पोलिसांनी खडा पहारा दिला. स्थानिक पोलिसांसोबत गुन्हे शाखेचे पोलिसही कार्यरत होते. दंगा काबू नियंत्रण पथक, राज्य राखीव दलाची तुकडी, क्यूक अकॅशन रिस्पॉन्स टीम यासारखी पथके मदतीला होती.