पतिनं WhatsApp व्दारे बोलावली ‘टॉप’ची कॉलगर्ल, समोर आल्यानंतर निघाली पत्नी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तराखंडच्या काशीपूरमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. ज्यात पती पत्नी एकमेकांना समोर पाहून थक्क झाले. पतीने कॉलगर्ल बोलवली होती आणि जेव्हा पतीसमोर कॉलगर्ल पोहचली तेव्हा ती त्याची पत्नीच असल्याचे त्याच्या लक्षात आले.

पतीने व्हॉट्सअ‍ॅपद्वारे एका महिला दलालाशी संपर्क साधला. त्याने यावर कॉलगर्लची मागणी केली. जेव्हा पतीकडे कॉलगर्ल पाठवण्यात आली तेव्हा ती त्याची पत्नी असल्याचे पतीच्या लक्षात आले. त्यानंतर दोघांत वाद झाला, हाणामारी झाली, त्यानंतर दोघांनी एकमेकांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.

काही वर्षांपूर्वी विवाह झालेले हे दोघे एकत्र न राहता पत्नी माहेरी राहत होती. ती सासरी कमी येत असे. त्यानंतर महिलेच्या एका मैत्रीणीने महिलेच्या पतीला सांगितले के तुझी पत्नी कॉलगर्लचे काम करते. मैत्रिणीने ही माहिती दिल्याच्या कारणाने त्या दोघींचा वाद झाला होता.

यानंतर पतीने श्यामपूरमध्ये राहणाऱ्या एका महिला दलालाशी व्हॉट्सअ‍ॅपवर संपर्क साधला. दलालाला सांगण्यात आले की त्याला एका कॉलगर्ल हवी आहे. त्यानंतर महिला दलालाने त्याला तरुणींचे फोटो पाठवले. महिलेने मेसेज केला की यातील एक निवडून सांगा. पतीने या फोटोत आपली पत्नी शोधली आणि तिला निवडले. महिला दलालाचा नंबर तरुणाला त्याच्या पत्नीच्या मैत्रिणीनेच दिला होता.

त्यानंतर तरुणाने महिला दलालाला पत्नीचा फोटो पाठवून दिला आणि बुक करुन भेटण्याचा पत्ता पाठवला. त्यानंतर पत्नी कॉलगर्लच्या रुपात पतीसमोर आली. यानंतर त्यांच्यात जोरदार भांडण झाले, दोघांनी एकमेकांना मारहाण केली.

त्यानंतर दोघांनी पोलिसात एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पत्नीने आरोप लावला की पतीचे तिच्या मैत्रिणीसोबत संबंध आहेत. तर पतीने पत्नी करत असलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –