खळबळजनक ! समलैंगिक संबंधाच्या आड येत होतो पती, पत्नीनं केले नवर्‍याचे ‘तुकडे-तुकडे’ अन् नाल्यात फेकले

जोधपूर : वृत्तसंस्था – जोधपूरमधून अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. समलैगिक संबंधांमुळं सासरी न जाण्यासाठी एका पत्नीनं पतीचीच हत्या केली आहे. कृषी विभागाचा अधिकारी असणाऱ्या या पतीचनं नाव आहे चरण सिंह आहे. चरण सिंह यांची पत्नी सीमा हिनं तिच्या बहिणी आणि एका व्यक्तीच्या मदतीनं मिळून चरण सिंह यांची हत्या केली. एवढ्यावरच सीमा थांबली नाही तिनं चरण सिंह यांच्या शरीराचे इलेक्ट्रॉनिक ग्राईंडरनं तुकडे तुकडे केले आणि नाल्यात फेकले.

कशी झाली हत्या ?

या घटनेनंतर आता या प्रकरणी बनाड ठाणे पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे आणि न्यायालयानं त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बनाड पोलिसांनी हत्येसाठी वापरण्यात आलेला इलेक्ट्रॉनिक ग्राईंडर आणि इतर साहित्य जप्त केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चरण सिंह यांची पत्नी सीमा आणि चरणच्या मेहुण्या म्हणजेच सीमाच्या बहिणी आणि एक ओळखीचा व्यक्ती भीयाराम जाट यांच्यासोबत मिळून चरण यांची हत्या केली. यानंतर त्यांनी चरण यांचा मृतदेह बाथरूमध्ये नेला आणि ग्राईंडरच्या मदतीनं त्याचे तुकडे तुकडे केले आणि ते नाल्यात फेकून दिले. हे तुकडे नगर पालिकेच्या सिव्हेज प्लांटमध्ये सापडल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती.

नेमका प्रकार काय ?

चरण सिंह यांची पत्नी सीमा हिचे एका महिलेसोबत समलैंगिक संबंध होते. हेच कारण होतं की, सीमा सासरी जाण्यास उत्सुक नव्हती. तसं तर चरण आणि सीमा यांच्या लग्नाला बरीच वर्षे झाली होती. परंतु सीमा काही चरण यांच्या घरी नांदत नव्हती. सामाजिक मर्यादा असल्यानं सीमा तिच्या संबंधांबद्दल कोणासोबतही बोलू शकत नव्हती. दुरीरकडे चरण सिंह यांनी तिच्यावर दबाव टाकायला सुरुवात केली. यानंतर सीमानं हे पाऊल उचललं ज्याचा कोणी विचारही करू शकणार नाही.