प्रियकरासोबत पळून जाणार्‍या बायकोला संपवलं, पत्नीच्या मृतदेहाजवळ काढली रात्र

इंदौर : वृत्तसंस्था – पत्नीचे अवैध संबंध असल्याने पत्नी प्रियकरासोबत सारखी पळून जात होती. अखेर वैतागलेल्या पत्नीने पत्नीचा खेळ संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीचा खून केल्यानंतर पतीनं तिच्या मृतदेहाजवळ रात्र बसून काढली. हा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील इंदौर येथील बेटमा परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. संजू राजपूत असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर दिलीप सिंह असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पतीनं आधी पत्नीला झोपेची गोळी दिली आणि त्यानंतर अवैध संबंध असल्याच्या रागातून तिचा गळा दाबून खून केला. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी पतीने पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून अख्खी रात्र काढली. सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने पत्नीचा मृत्यू झाल्याचे सांगून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अखेर पतीचे बिंग फुटले आणि पत्नीच्या खूनाचा कट रचणाऱ्या पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

असा आला कट उघडकीस
संजू राजपूतने गळफास घेून आत्महत्या केल्याची माहिती बेटमा पोलिसांना मिळाली होती. आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, नातेवाईकांनी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले होते. या घटनेदरम्यान संजूच्या पतीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने धक्कादायक खुलासा केला.

3 ऑगस्ट रोजी कारण काढून पत्नी प्रियकरासोबत पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पती दिलीप सिंह याला मिळाली होती. त्याने पत्नीचा पळून जाण्याचा डाव उधळण्यासाठी तिला घरातील एका खोलीत डांबून ठेवले. पत्नी पळून गेली तर समाजात आपली इज्जत आणि तिला मिळणारी जमीन दोन्ही गोष्टी जातील या हेतूने त्याने तिला मारण्याचा कट रचला. त्याने तिच्या रात्रीच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. मध्यरात्रीच्या सुमारास तिचा गळा आवळून खून केल्याची कबूली त्याने पोलिसांच्या चौकशीत दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.