इंदापूर : पतीने पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करून केली मारहाण

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – लग्नात व्यवस्थित मानपान दिले नाही, स्वयंपाक चांगला करता येत नाही अशा किरकोळ कारणांवरून पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करत मारहाण केल्याची घटना इंदापूर तालुक्यातील माळवाडी नंबर २ येथे घडली आहे. या विरोधात पती आणि सासू सासरे यांच्याविरोधात इंदापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती अतुल तुकाराम एकतपुरे, सासरे तुकाराम रामचंद्र एकतपुरे व सासू भामाबाई तुकाराम एकतपुरे (सर्व रा. अकलूज माळवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. जयश्री अतुल एकच एकतपुरे राहणार इंदापूर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. २६ नोव्हेंबर ला दोघांचा विवाह झाला. विवाहानंतर एक वर्षभर यांचा संसार सुखात चालला होता. त्यानंतर पत्नीला स्वयंपाक चांगला करता येत नाही लग्नात तुझ्या वडिलांनी व्यवस्थित मानपान दिले नाही या कारणावरून पती, सासू, सासरे यांनी मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. सासू-सासर्‍यांचे ऐकून पती हे दारू पिऊन घरी येत असत पत्नीला त्रास देऊन मारहाण करत असेत. दरम्यान, त्यांना एकही आपत्ती झाले नाही.

दरम्यान, ९ नोव्हेंबर २०२० ला पतीने दारुच्या नशेत पत्नीला मारहाण करून संध्याकाळी घरातून हाकलून दिले त्यानंतर या वडिलांकडे राहत होत्या. ८ एप्रिल २०१९ ला पती रात्री दारूच्या नशेत वडिलांच्या घरी गेला त्यानंतर पत्नी आणि आई वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार मड्डी हे करत आहेत.