हैदराबाच्या डॉक्टर महिलेच्या बलात्कार आणि खून प्रकरणानंतर ‘या’ अभिनेत्रीनं केलं ‘वादग्रस्त’ विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हैद्राबादमधील महिला पशुचिकित्सकाच्या हत्या आणि बलात्काराची हृदयद्रावक घटना समोर आली. यानंतर पूर्ण देश या घटनेनं हळहळत आहेत. अशातच बॉलिवूड स्टार पायल रोहतगीनं वादग्रस्त विधान केलं आहे. पायल आपल्या सिनेमांपेक्षा वादग्रस्त विधानांमुळेच चर्चेत येताना दिसत आहे. दरम्यान पायलच्या या वादग्रस्त विधानामळे लोकांनी तिला सोशलवर प्रचंड ट्रोल केलं आहे.

पायलनं ट्विट करत म्हटलं की, “राम राम जी, मुस्लिम परिसरात एका हिंदू मुलीवर बलात्कार करण्यात आला आणि तिची हत्या करण्यात आली.” तिच्या या ट्विटमुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे.

एक युजर पायला रिप्लाय करताना म्हणाला, “रिकाम्या डोक्यात असे विचार येतात. हिला बोलायला कोणी सांगितलं.” आणखी एकानं म्हटलं की, “थोडी तरी लाज बाळग. यातही हिंदू-मुस्लिम आणतेस?”

नेमकी घटना काय ?
गुरुवारी रात्री हैद्राबादमध्ये एका महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार करून तिच्या हत्या करण्यात आली. पोलिसांनी याबाबत माहिती दिली की, आरोपींनी पीडितेचं अपहरण केलं आणि तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. लवकरच त्यांना माध्यमांसमोर आणलं जाईल असंही पोलिसांनी सांगितलं.

या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. यात दोन वाहनचालक आणि एक क्लीनर आहे. मोहम्मद पाशा, नवीन, केशावुलु आणि शिवा अशी या 4 आरोपींची नावे आहेत.

Visit : Policenama.com