वैद्यकीय अधिक्षक यांचे मनमानी कारभारामुळे इंदापूर उपजिल्हा रुग्णालय सलाईनवर

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन 

पेशंट रुग्णालयात व डाॅक्टर घरी अशी स्थिती सध्या इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाची झाली असून रुग्णालयात सुविधांचा वानवा आहे. अपुऱ्या सुविधामुळे इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात सध्या समस्यांचा डोंगर उभा असून उपजिल्हा रुग्णालय सध्या सुविधांच्या बाबतीत सलाईनवर असल्याचे दिसुन येत आहे.

इंदापूर उपजिल्हा रुग्णालय वैद्यकिय अधिक्षक राजेश मोरे यांचा समनमानी कारभार चालू असून रुग्णालयात अस्वच्छता, औषध गोळ्यांचा तुटवडा, रूग्णांची औषधोपचाराविना होणारी हेळसांड अशा आनेक असुविधामुळे इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात सध्या समस्यांचा डोंगर उभा आहे. म्हणजेच उपजिल्हा रूग्णालय सध्या सुविधांच्या बाबतीत सलाईनवर असल्याचे चित्र दिसुन येत आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’04a21a47-cc81-11e8-80dd-4d6cddf559aa’]

सध्या हिवताप, डेंगू, स्वाईन फ्ल्यु या सारख्या आनेक प्राणघातक आजारांची साथ पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पसरली असल्याने पुणे जिल्ह्यातील सर्व दवाखाने रुग्णांनी गच्च भरलेले आहेत. तर इंदापूर उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक मात्र या आजारापासुन अनभिज्ञ असल्याचे समजते. याचे कारणही मजेशिरच आहे. अधिक्षक मोरे हे पुणे येथे राहुन इंदापूर उपजिल्हा रूग्णांलयाचा कारभार हाकत आसुन आठवड्यातुन एखाद दुसरी चक्कर त्यांची इंदापूर उपजिल्हा रूग्णालयाकडे नुसत्या सह्या करण्याच्या कामासाठी होत असल्याची चर्चा आहे. तर रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक मोरे पुणे येथुन इंदापूर उपजिल्हा रूग्णालयाचा कारभार हाकत असल्याने रुग्णालय मात्रअनेक समस्यांनी घेरलेले दिसुन येत आहे.

मागील दहा ते बारा दिवसापासुन रूग्णांलयातील कंत्रीटी महिला सफाई कर्मचारी यांना कामावर न येण्याच्या सुचना मोरे यांनी दिल्याने रूग्णांलयातील अस्वच्छतेने कळसच गाठला आहे.शौचालये, मुतार्‍या तुंबल्या आसुन आनेक शौचालयांना तर चक्क दरवाजेच नसल्याचे निदर्शनास येत आहे. पिण्याचे पाण्याची मोठी टाकी रूग्णालयात बसविण्यात आली आहे. परंतु टाकीच्या चोहो बाजुला दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरल्याने रूग्णांची गैर सोय होत आहे.रूग्णालयात साफसफाई होत नसल्याने रूग्णालयातील घाणिच्या उग्र वासाने रूग्ण व नागरीकांना नाकाला रूमाल बांधुन त्रास सोसावा लागत आहे.

[amazon_link asins=’B01G5I8YLC,B016EOZ7OO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’15153906-cc81-11e8-aea2-c7b6cfc9485c’]

रुग्णालयात पाणी गरम करण्यासाठी बारा ते पंधरा लाख रूपये खर्च करून गरम पाणी सोलर सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. परंतु वैद्यकिय अधिक्षक यांचे मनमानी कारभारामुळे सोलर सिस्टीम मागील आनेक दिवसापासुन बंद धुळखात पडलेली दिसून येत आहे.तर डिलिव्हरीसाठी आलेल्या पेशंटचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. सिझर झालेल्या पेशंटचे आणखीनच हाल होत आहेत. गरम पाणी सुविधा चालु नसल्याने डील्हीवरी झालेल्या महीलांना गरम पाणी न मिळाल्याने इतर आजारांना सामोरे जावे लागत आहे. या बाबतची कसलीही काळजी रुग्णालय प्रशासनाकडून घेण्यात येत नसल्याने रूग्ण बरे होण्याऐवजी त्यांच्या समस्येत आणखीनच भर पडत आहे.याबाबत अधिक्षक मोरे याना विचारले असता विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे न देता दुसरीच उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.