‘हिंदुत्त्वाचा खेळ माझ्याशी करू नका; मी सुद्धा एक हिंदू मुलगी’

कोलकाता : पोलीसनामा ऑनलाइन – पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक चांगलीच रंगात आली आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप याचाकात जोरदार घमासान पाहायला मिळत आहे. मुख्यामंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममध्ये रॅली काढली होती. त्यानंतर झालेल्या सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी चंडीपाठ या धार्मिक लेखातील मंत्रांचे पठण केले. घरातून बाहेर पडण्यापूर्वी मी दररोज चंडीपाठाचे उच्चारण करते. मी एक हिंदू मुलगी आहे. त्यामुळे भाजपने माझ्याबरोबर हिंदुत्ववादाचा खेळ नये असे ठणकावतानाच एक चांगला हिंदू कसे बनता येतं ते तुम्हाला माहित आहे का, असा सवालही ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला.

तत्पूर्वी, निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यामंत्री ममता बॅनर्जी यांना दुखापत झाली आहे. नंदीग्राममधून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्या एका मंदिरात गेल्या होत्या. तेथून बाहेर आल्यावर त्या कारजवळ थाबूंनच कार्यकर्त्यांशी बोलत होत्या. त्यानंतर कारमध्ये शिरण्याच्या बेतात मुख्यमंत्री असताना काही समाजकंटकांनी कारचा दरवाजा त्यांच्या दिशेने ढकलल्याने पायाला जखम झाली. या प्रकारानंतर त्यांना कोलकातायेथे उपचारासाठी आणण्यात आले.

दरम्यान, नंदिग्राममध्ये तुम्ही आम्हाला परक्या आहात, अशी पोस्टर्स भाजपने लावली आहेत. त्यामुळे तेथील वातावरण तणावाचे झाले अशातच. हा प्रकार घडल्याने तृणमूलचे कार्यकर्ते संतापले आहेत. यामागे भाजपचे लोक असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.