शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीर मधील पुलवामा जिल्हयात अवंतिपुरा येथे झालेल्या दहशतवादी स्फोटक हल्ल्यात लष्कराचे ४२ जवान शहीद झाले आहेत. तर अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला घडवल्याची जबाबदारी घेतली आहे. या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दात निषेद केला आहे. पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शहिदांचे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हणले आहे. त्याच प्रमाणे त्या जवानांच्या शौर्याचा आम्हाला अभिमान वाटतो, जे जवान शहीद झाले आहेत त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.


जखमी जवानांना लवकरात लवकर आराम मिळावा अशी मी सदिच्छा व्यक्त करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. देश या हल्ल्याने दु:खी झाला असून शहीद जवानांच्या बलिदानाचा बदला घेण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. पाकिस्तानची या दहशतवादी हल्ल्याला फूस असल्याचे देखील सुरक्षा क्षेत्रातील जाणकारांनी म्हणले आहे.


भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. तसेच या हल्ल्याची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनएआय ) करण्याचे हि केंद्र सरकारने म्हणले आहे. त्याच प्रमाणे भारताचे गृहमंत्री हे उद्या काश्मीरच्या दौऱ्यावर जाऊन घटनेची माहिती घेणार आहेत. देशात निवडणुकीचा मोसम असताना झालेला हा हल्ला केंद्र सरकार पुढे आव्हान म्हणून उभा राहिला आहे. केंद्र सरकार या घटनेचा बदला घेण्याचा पवित्रा घेऊ शकतो असे सुरक्षा जाणकार सांगत आहेत.