IAS Dr. Anil Ramod | लाचखोर आयएएस डॉ. अनिल रामोड प्रकरणात मोठं अपडेट ! दानवेंनी समोर आणलं राधाकृष्ण विखे-पाटलांचं ‘ते’ पत्र

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – IAS Dr. Anil Ramod | लाचखोर अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांच्याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. डॉ. अनिल रामोड (IAS Dr. Anil Ramod) यांची पुणे विभागातून बदली करू नये म्हणुन भाजपचे नेते आणि राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Maharashtra Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) शिफारस पत्र लिहिले होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी ते पत्र ट्विट करत राधाकृष्ण विखे-पाटलांवर टीका केली आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील जागेच्या भूसंपादनाचा (Land Acquisition In Solapur District) वाढीव मोबदला मिळवुन देण्यासाठी डॉ. रामोड यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) Central Bureau of Investigation (CBI) 8 लाख रूपयाची लाच घेताना अटक केली होती.

 

अंबादास दानवे ट्विट केलेल्या पत्रात म्हणतात,

व्वा रे व्वा विखे पाटील!

पुणे येथे आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड (IAS Dr. Anil Ramod) हा 8 लाख रुपये लाच घेतल्यामुळे सीबीआयने अटक केल्यावर सध्या कारागृहात आहे. परंतु या प्रकरणात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे नाव समोर आले आहे, त्या मंत्र्याने रामोड याची बदली पुण्यावरुन करु नये, यासाठी शिफारस पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले होते, महसूल अधिकारी अनिल रामोड याला पुण्यात एक वर्ष मुदतवाढ देण्यात यावी, यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी शिफारस केली होती, त्यांनी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यांना पत्र लिहिले होते, १ जून रोजी विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले होते, रामोड हे पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात अतिरिक्त आयुक्तपदी होते. त्याला याच पदावर मुदत वाढ मिळावी, असे पत्र विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते.

 

 

दानवेंनी केलेल्या आरोपांमुळे आता प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी महसुलमंत्री विखे पाटील यांच्यासह राज्य सरकार नेमकं काय स्पष्टीकरण देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title :  IAS Dr. Anil Ramod | shivsena ambadas danve shares letter of bjp radhakrishna vikhe patil
regarding pune ias dr anil ramod

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा