ICC च्या ‘या’ नियमाचा विराटलाही धसका ; भारतासाठी ठरणार घातक

पोलीसनामा ऑनलाईन टीम –अगदी काही तासात सुरु होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड कप म्हणजेच क्रिकेटच्या सर्वात मोठ्या युध्दाला सुरुवात होणार आहे. मात्र यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये नियमांत मोठे बदल करण्यात आले आहेत. यातील एका नियमाचा फटका भारताला बसण्याची शक्यता आहे. १९९२ च्या विश्वचषकात पहिल्यांदा वापरल्या गेलेल्या राऊंड रॉबीन पध्दतीचा तब्बल २७ वर्षांनी वापर करण्यात येणार आहे.

रॉबीन राऊंडचा असा धसका
आयसीसीने यंदाच्या हंगामात रॉबीन राऊंड पध्दतीचा वापर केल्याने प्रत्येक संघ एकमेकासोबत भिडणार आहे. ज्या संघाने विश्वचषक स्पर्धेत सर्वात जास्त लीग सामने जिंकले असतील ते ४ संघ टॉप ४ मध्ये असणार आहेत. जर २ संघांचे गुण समान झाले तर त्यांचा रनरेट गृहीत धरून त्यांना स्थान देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्यात रनरेट चांगला असणे आणि तो जिंकणे महत्वाचे आहे. जर लीग स्टेजमध्ये गुण आणि रनरेट समान असतील तर जो संघ वरती आहे. तो फायनलमध्ये जाण्यास पात्र होईल. सध्या साऊथ आफ्रिकेचा संघ सीडींगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारताचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे याचा फटका भारताला बसणार आहे.

पहिल्यांदाच सुपर ओहरचा थरार
या विश्वचषकात पहिल्यांदाच सुपर ओव्हरचा थरार पहायला मिळेल. परंतु केवळ सेमी फायनल आणि फायनलसाठी हा सुपर ओहरचा थरार असेल. यात दोन संघांमध्ये मॅच टाय झाली तरच सुपर ओव्हर असेल. २०११ मध्ये सुपर ओव्हरचा नियम होता. मात्र २०१५ च्या वर्ल्ड कपमध्ये हा नियम हटविण्यात आला होता. त्यामुळे आता विराटच्या चिंचेत वाढ झाली आहे.