World Cup 2019 : पाकच्या कर्णधाराने साधला भारतीय चाहत्यांवर निशाणा

लंडन : पोलीसनामा ऑनलाइन – क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत बुधवारी पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियाशी सामना होणार आहे.या स्पर्धेच्या पुर्वसंध्येला आज झालेल्या पत्रकारपरिषदेत पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद अहमदने पाकिस्तानी चाहत्यांचे गोडवे गात भारतीय चाहत्यांवर मात्र अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्याने दोन्ही देशांच्या चाहत्यांची जणूकाही तुलनाच केली.

नेमकं काय म्हणाला सर्फराज अहमद :
‘उद्याच्या सामन्यात पाकिस्तानचे चाहतेही भारतीय चाहत्यांप्रमाणे डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथला हूटिंग करू लागले तर तुही विराट कोहलीप्रमाणेच भूमिका घेशील का ?’ असा प्रश्न सर्फराजला विचारला गेला होता. त्यावर उत्तर देताना ‘पाकिस्तानी चाहते असे करणार नाहीत, कारण ते क्रिकेट आणि खेळाडूंवर अतोनात प्रेम करतात.’ असे उत्तर दिले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात स्टीव्ह स्मिथ क्षेत्ररक्षण करत असताना भारतीय चाहत्यांनी चीटर चीटर म्हणत त्याला चिडवायला सुरुवात केली. यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहलीने प्रेक्षकांना थांबवलं. असे केल्यानंतर त्याने स्टीव्ह स्मिथ माफीदेखील मागितली. यासंदर्भात कोहलीचे सर्वत्र कौतुक देखील होत आहे.

बुधवारी होणाऱ्या सामन्याबाबत सर्फराज अहमदने आम्ही ऑस्ट्रेलियाचे आव्हान स्वीकारण्यासाठी तयार असल्याचे सांगिलते. दरम्यान श्रीलंकेविरुद्धचा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना एक एक गुण देण्यात आला होता.त्याआधी पाकिस्तानला वेस्ट इंडिजविरुद्ध 7 विकेटने पराभव पत्करावा लागल्यानंतर इंग्लंडवर त्यांनी 14 धावांनी विजय मिळवला होता. आता बुधवारी होणाऱ्या सामन्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

You might also like