ICC ODI World Cup | वर्ल्ड रेकॉर्ड! वन डे वर्ल्ड कपमध्ये प्रथमच पहिल्या चार फलंदाजांचे अर्धशतक

मुंबई : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील (ICC ODI World Cup) अखेरच्या साखळी सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध भारताचे (IND vs NED) पहिले चार फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma), शुबमन गिल (Shubman Gill), विराट कोहली (Virat Kohli), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी जोरदार फटकेबाजी करत वैयक्तिक अर्धशतक झळकावून वर्ल्ड रेकॉर्ड (World Record) केला आहे. ४८ वर्षांत हा विक्रम पहिल्यांदाच झाला आहे. (ICC ODI World Cup)

शुबमन गिलने ३१ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५१ धावा, रोहित शर्मा ५४ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ६१ धावा, श्रेयस अय्यर ६६ चेंडूंत ७१ धावा, कोहलीने ५६ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५१ धावा केल्या.

वन डे क्रिकेटमध्ये भारताच्या आघाडीच्या चार फलंदाजांनी पन्नास प्लस धावा करण्याची ही पाचवी वेळ असली तरी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात असे प्रथमच घडल्याने हा वर्ल्ड कप स्पर्धेतील विश्व विक्रम ठरला आहे. (ICC ODI World Cup)

वन डे क्रिकेटमध्ये भारताच्या आघाडीच्या चार फलंदाजांनी यापूर्वी २००६ (वि. इंग्लंड), २००७
(वि. इंग्लंड), २०१७ (वि. पाकिस्तान), २०२३ (वि. पाकिस्तान) यांच्याविरुद्ध अशी कामगिरी झाली आहे.
वर्ल्ड कपमध्ये अशी कामगिरी प्रथमच झाली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IND vs NED | एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताने फोडले फटाके, श्रेयस, राहुलची शतके; भारताचे नेदरलँड समोर 410 धावांचे आव्हान

Janhavi Kapoor Saree Look | अबब..!! जान्हवी कपूरनं घातली तब्बल ‘इतक्या’ किमतीची साडी…