पुण्यात भारत-पाक क्रिकेट सामन्यात टिम इंडिया जिंकल्यास ‘येथे’ मिळणार १५ हजाराचा TV १० हजारात

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – आयसीसी विश्वचषक २०१९ ची सुरुवात झाल्यानंतर सर्वात जास्त नजरा खिळल्या आहेत त्या भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यावर. याच सामन्यासाठी आता व्यावसाईकही हिरीरीने भाग घेताना दिसत असून दौंड शहरामधील एका व्यावसायिकाने अशीच एक धमाकेदार स्कीम आपल्या ग्राहकांना दिली असून जर आजच्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताचा विजय झाला तर १५ हजाराचा टिव्ही १० हजाराला देण्याची घोषणा निलकमल लुंड या दुकानदाराने केली आहे.

प्रकाश इलेक्ट्रॉनिक्स नावाने दौंड शहरामध्ये दुकान आहे. या दुकानदाराच्या ऑफरमुळे सर्वांच्या नजरा आजच्या सामन्याच्या निकालाकडे लागल्या आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात मुकाबला मॅनचेस्टर येथे जुन्या ट्रेफर्ड मैदानावर होत आहे. सामन्याची सुरुवात आज दुपारी तीन वाजल्यापासून झाली असून भारत प्रथम फलंदाजी करत आहे.

आरोग्य विषयक वृत्त-
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय जरूर करा
कांदा व लसूण एकत्र खा, होतील ‘हे’ फायदे
पेस्ट कंट्रोल पेक्षा हे उपाय करा, किटक जातील पळून

You might also like