विराट कोहलीला सचिनचा ‘हा’ रेकॉर्ड मोडण्याची संधी !

ट्रेंट ब्रिज : वृत्तसंस्था – आयसीसी वर्ल्ड कप २०१९मध्ये आज होणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या सामन्यावर पावसाचे सावट आहे. त्यामुळे आजचा सामना भारतीय प्रेक्षकांना स्पर्धेच्या दृष्टीने जरी महत्वाचा असला तरी भारतीय कर्णधार विराट कोहलीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची संधी आहे. आजच्या सामन्यात विराट कोहलीने ५७ धाव केल्या तर तो एकदिवसीय सामन्यात ११ हजार धावांचा टप्पा पार करेल. सर्वात जलद ११ हजार धावा करण्याचा देखील विक्रम आज तो करू शकतो.
भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर याने २७६ डावात ११ हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला होता. विराट कोहलीन जर आजच्या सामन्यात तो विक्रम मोडला तर तो मोठा विक्रम ठरणार आहे. विराट कोहली आतापर्यंत २२२ एकदिवसीय डाव खेळला आहे. यापूर्वी केवळ भारताकडून सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी हा पल्ला पार केला आहे.

जर त्याने आज हा पल्ला गाठला तर तो ११ हजार धाव करणारा जगातील ९ वा आणि भारताचा तिसरा खेळाडू ठरणार आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक धाव करणाऱ्या भारतीयांमध्ये वीरेंद्र सेहवागचा रेकॉर्ड मोडण्याची देखील संधी त्याला आहे.

दरम्यान, भारताने याला स्पर्धेत आतापर्यंत २ सामने खेळले असून दोन्ही सामन्यात विजय मिळवला असून १६ जून रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान बरोबर खेळणार आहे.

सिने जगत –

सलमान पेक्षा 9 वर्षाने लहान असलेली अभिनेत्री चित्रपटात त्याची ‘आई’ ; ट्रोलिंग सुरू, ट्रोलर्सना दिले ‘असे’ उत्‍तर

शाहरूख खानची मुलगी सुहाना आता ‘या’ फिल्म मध्ये काम करणार

‘त्याच्या’शी ब्रेकअप झाल्यानंतर ‘या’ गोष्टीमुळे सावरले : कतरिना कैफ

सिंगर नेहा भसीनने शेअर केले तिचे ‘हॉट’ फोटो अन् पहाता-पहाता सोशलवर धुमाकूळ