‘या’ मोठ्या आंतरराष्ट्रीय बँकेनं सुरू केली नवीन सुविधा, कार्ड शिवाय ATM मधून काढू शकाल दररोज 20 हजार रूपये, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीआयसीआय बँके (ICICI Bank) ने आपल्या ग्राहकांसाठी नवीन सुविधा सुरु केली आहे. ICICI बँकेने मंगळवारी ‘कार्डलेस कॅश विड्रॉल’ (Cardless Cash Withdrawal) ही सुविधा सुरु करण्याची घोषणा केली. या सुविधेद्वारे ग्राहक बँकेच्या मोबाइल बँकिंग अ‍ॅप्लिकेशन ‘आयमोबाईल’ (iMobile) च्या माध्यमातून बँकेच्या १५,००० पेक्षा अधिक एटीएममधून रक्कम काढू शकणार आहेत. डेबिट कार्डचा वापर न करता रोख रक्कम काढणे हा एक सोपा आणि सोयीस्कर मार्ग असणार आहे. या सुविधेअंतर्गत दैनंदिन व्यवहाराची मर्यादा २०,००० रुपये ठेवण्यात आली आहे.

या सुविधेबाबत माहिती देताना आयसीआयसीआय बँकेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनुप बाग यांनी सांगितले की, आयसीआयसीआय बँक सुरुवातीपासूनच डिजिटल नवनवीन कल्पनांबाबत सर्वात पुढे असते. या संदर्भात, ‘कार्डलेस कॅश विड्रॉल’ ही सुविधा आमच्या ग्राहकांना रोजच्या वापरासाठी आणि खरेदीसाठी त्यांच्या मोबाइल फोन सुविधेतून सुरक्षितपणे आणि सहजपणे उपलब्ध होणार आहे.

तसेच ते म्हणाले की आमच्या या निर्णयामुळे आमच्या ग्राहकांना एक अनोखा अनुभव येणार आहे. तसेच आम्ही आयसीआयसीआय बँक मध्ये सर्व चॅनेल व टच-पॉईंट्समध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर जास्त भर देत आहोत आणि आमच्या ग्राहकांना जास्तीत जास्त बँकिंग सुविधा उपलब्ध करून त्या अधिक सोयीस्कर कशा होतील यासाठी प्रयत्नशील आहोत.

‘कार्डलैस कॅश विड्रॉल’ सुविधा चे फायदे

– रोख रक्कम काढण्यासाठी आता डेबिट कार्ड सोबत घेण्याची आणि एटीएम पिन लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही.
– आयसीआयसीआय बँकेच्या १५,००० पेक्षा जास्त एटीएममध्ये ही सुविधा उपलब्ध.
– दररोज २०,००० रुपयांपर्यंतची रोकड काढता येईल.
– आयमोबाईल हे अ‍ॅप्लिकेशन वापरुन रोख रक्कम काढण्याचा सुरक्षित व विश्वासार्ह मार्ग.

कसे काढू शकणार पैसे?

– ‘आयमोबाईल अ‍ॅप’ वर लॉग इन करा आणि “सर्विस एण्ड कॅश विड्रॉल एट आयसीआयसीआय बँक एटीएम” पर्याय निवडा.
– रक्कम प्रविष्ट करा, खाते क्रमांक निवडा, ४ अंकी तात्पुरता पिन तयार करा आणि सबमिट करा.
– त्वरित एक रेफरन्स ओटीपी (वन टाइम पासवर्ड) मिळवा.
– आयसीआयसीआय बँकेच्या कोणत्याही एटीएमवर जा.
– ‘कार्डलैस कॅश विड्रॉल’ निवडा, मोबाइल नंबर, रेफरन्स ओटीपी नंबर, एटीएम पिन आणि रक्कम प्रविष्ट करा.
– त्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील.
– रोख पैसे काढण्याची विनंती आणि ओटीपी दुसर्‍या दिवसाच्या मध्यरात्रीपर्यंत वैध राहील.

फेसबुक पेज लाईक करा –