आयडीबीआय बॅंकेच्या दालनाची तोडफोड करणाऱ्यांना जामीन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान शिवाजीनगर येथील आयडीबीआय बॅंकेच्या दालनाची तोडफोड करण्यात आली होती. यामध्ये बँकेचे अडीच लाखांचे नुकसान झाले होते. या गुन्ह्यातील सहा जणांना आज (रविवार) जामीन मंजुर केला आहे. दरम्यान, कोथरूड पोलिसांनी अटक केलेल्या 50 आंदोलनकर्त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b76e1550-9e4f-11e8-a001-31c3be442958′]

अनिकेत दत्तात्रय भोसले (वय 21, रा. जुनी वडारवाडी, शिवाजीनगर), समीर सत्यवान बोरकर (वय 29), श्रेयस ज्ञानेश्‍वर कुमावत (वय 22), विक्रांत चंद्रकांत राऊत (वय 24), शुभम शंकरराव पाटील (वय 21, चौघेही रा. कसबा पेठ) आणि ऋषिकेश अशोक यादव (वय 21, रा. गुंजाळवाडी, पांडवनगर) अशी जामीन मिळालेल्यांची नावे आहेत. याबाबत सौरभ रामरणधीर सिंग (वय 42, रा. थेरगाव, चिंचवड) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दि. 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदीची हाक देण्यात आली होती. त्या दिवशी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर येथील आयडीबीआय बॅंकेत काम सुरू असताना दुचाकीवर आलेल्या 25 ते 30 आंदोलनकर्त्यांनी बॅंकेच्या दालनाची तोडफोड करून सुमारे अडीच लाख रूपयांचे नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान कोथरूड पोलिसांनी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक केलेल्या 50 आंदोलनकर्त्यांना रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत अपल्याने सर्व आंदोलकांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने सर्वांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
[amazon_link asins=’B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ed0ae897-9e4f-11e8-8bdb-452044ed88bb’]

बचाव पक्षातर्फे पुणे बार असोसिएशनच्या वतीने मोफत बाजू मांडण्यात येत आहे. रविवारी अध्यक्ष ऍड. सुभाष पवार, ऍड. समीर घाटगे, ऍड. अमरसिंह पाटील, ऍड. पुष्कर दुर्गे, ऍड. सुधीर मुळे, ऍड. अमोल शितोळे, ऍड. राकेश ओझा, ऍड. नितीन झंजाड यांनी काम पाहिले.