‘या’ बँकेत सेव्हिंग अकाऊंट उघडणार्‍या कोट्यावधी खातेदारांना मोठा झटका !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील दोन सर्वात मोठ्या सरकारी बँका पंजाब नॅशनल बँक आणि एसबीआय नंतर आता आयडीबीआयने एक मोठा निर्णय घेत बचत खात्यातील व्याजदर कमी केले आहे. बँकेने बचत बँक खात्यातील व्याजदर ०.२० टक्क्यांनी कमी केले आहेत. यापूर्वी एसबीआयने देखील व्याज दर कमी केले आहेत. जर एसबीआय ग्राहकांच्या खात्यात एक लाख रुपये जमा असतील, तर ग्राहकाला एका वर्षात २.७५ टक्के व्याज दराने २,७५० रुपये व्याज मिळेल. भारतीय जीवन विमा महामंडळाकडून मोठ्या हिस्सेदारीची खरेदी केल्यानंतर आता आयडीबीआय बँक खासगी क्षेत्रातील बँक बनली आहे. जानेवारी २०१९ मध्ये एलआयसीने आयडीबीआय बँकेत ५१ टक्के हिस्सा संपादन केला होता.

आयडीबीआय बँकेत झाला आणखी एक मोठा बदल
अंशुमन शर्मा यांची शासकीय नामनिर्देशित संचालक म्हणून नियुक्ती करण्यास त्यांच्या मंडळाने मान्यता दिली असल्याचे आयडीबीआय बँकेने सांगितले. ११ जून २०२० पासून त्यांची नियुक्ती लागू होईल.

बँकेने शेअर बाजाराला सांगितले की, संचालक मंडळाने अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाचे संचालक अंशुमान शर्मा यांना ११ जून २०२० पासून पुढील आदेशापर्यंत आयडीबीआय बँक लिमिटेडच्या मंडळावर सरकारने संचालक म्हणून नियुक्तीस मान्यता दिली आहे.

पीएनबीने देखील कमी केले आहे बचत खात्यांवरील व्याज दर
आता पीएनबीच्या बचत खात्यात ५० लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर वर्षाला ३ टक्के आणि ५० लाखांपेक्षा जास्त रकमेवर वर्षाला ३.२५ टक्के व्याज दर मिळेल.

आयसीआयसीआय बँकेने बचत खात्यातील व्याज दर ०.२५ टक्क्यांनी कमी केले आहे. आयसीआयसीआय बँकेने शेअर बाजाराला पाठवलेल्या सूचनेत म्हटले आहे की, त्यांनी ५० लाखाहून कमी असलेल्या सर्व ठेवींवर व्याज दर ०.२५ टक्क्यांनी कमी केले आहे, ज्यानंतर हा दर ३.२५ वरून ३ टक्क्यांवर आला आहे.

५० लाख किंवा त्याहून अधिक ठेवीवरील व्याज दर ३.७५ वरून ३.५० टक्के करण्यात आले आहे. बचत खात्यावरील नवीन व्याज दर गुरुवार ४ जूनपासून लागू होतील, असे बँकेने म्हटले आहे.

इथे मिळत आहे बचत खात्यावर ७ टक्क्यापर्यंत व्याज
आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या बचत खात्यात १ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर वर्षाकाठी ६%, १ लाख ते १ कोटी रुपयांच्या ठेवींवर ७ टक्के व्याज वर्षाला दिले जाते. बँकेने घरबसल्या खाते उघडण्याची सुविधा सुरू केली आहे.

बंधन बँकेत बचत खात्यावर दररोज १ लाख ते १० कोटी रुपयांच्या रकमेवर ६ टक्के, १० कोटी ते ५० कोटी रुपये रकमेवर ६.५५ टक्के आणि ५० कोटींपेक्षा जास्त रकमेवर ७ टक्के व्याज दिले जात आहे.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेच्या बचत खात्यात १ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीवरील व्याज दर ६.२५ टक्के आहे. १ लाख ते १० लाख रुपयांपर्यंत ६ टक्के आहे. तसेच १० लाखाहून अधिक ठेवींवर ७ टक्के आहे.

ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँकेच्या बचत खात्यात ७ टक्के व्याज मिळत आहे. १ लाख ते १० लाख रुपयांवरील ठेवींवर ६.५० टक्के आणि १० लाख रुपयांवरील ठेवींवर ७ टक्के वार्षिक व्याज दिले जाईल.