…तर पाकिस्तानात फुटा ; ओमर अब्दुल्लांवर ‘या’ क्रिकेटरचा हल्लाबोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्वतंत्र पंतप्रधान, राष्ट्रपत्री आणि संविधान असणारे कश्मीर पुन्हा बनवू या जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांच्या वक्तव्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केलेला टीम इंडियाचा माजी क्रिकेट खेळाडू गौतम गंभीर व ओमर अब्दुल्ला यांच्यात जोरदार ट्विटरयुद्ध रंगले आहे.

यावरून गंभीरने अब्दुल्ला यांना पाकिस्तानात चालते व्हा असे म्हटले आहे, तर त्याला उत्तर देत राजकारणाएवजी ‘आयपीएल’बद्दल ट्विट कर असा सल्ला अब्दुल्ला यांनी गंभीरला दिला आहे.

लोकसभा निवडणूकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. त्यात संवेदनशिल असलेल्या जम्मू काश्मिर मध्ये तर जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान, सोमवारी कश्मीरमध्ये निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना ओमर अब्दुल्ला यांनी पूर्वीप्रमाणे आपले स्वतंत्र पंतप्रधान, राष्ट्रपती आणि संविधान असणारे राज्य आपण पुन्हा आणू असे बेताल वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून अब्दुल्ला यांचा देशभरातून निषेध करण्यात आला होता. त्याचाच निषेध करतान गौतम गंभीरने आक्रमक ट्वीट केले होते.

‘ओमर अब्दुल्ला यांना जम्मू-कश्मीरसाठी स्वतंत्र पंतप्रधान हवा आहे आणि मला समुद्रावर चालायचे आहे, ओमर अब्दुल्ला यांना पंतप्रधान हवा आहे आणि मला डुक्कराला उडताना पाहायचे आहे’, असे उपहासात्मक ट्वीट गंभीरने केले होते. तसेच, ‘ओमर अब्दुल्ला यांना स्वतंत्र पंतप्रधानांचा विचार करण्याचाऐवजी कॉफी पिऊन झोप घेण्याची आवश्यकता आहे. जर तरीही त्यांना काही समजले नाही तर त्यांना पाकिस्तानी पासपोर्टची आवश्यकता आहे’, असे नमूद करत एकप्रकारे पाकिस्तानमध्ये फूटण्याचा सल्ला दिला.

गंभीरच्या या खोचक ट्विटनंतर ओमर अब्दुल्ला यांनी ट्वीट करत याला प्रत्युत्तर दिले आहे. ‘गौतम, मी जास्त क्रिकेट खेळलेलो नाही, कारण मला माहिती आहे मी या खेळामध्ये परिपूर्ण नाही. तुला जम्मू-कश्मीर, त्याचा इतिहास व जम्मू-कश्मीरचा इतिहास लिहिण्यामागील नॅशनल कॉन्फरन्सची भूमिकेबाबत माहिती नाही. तुला ज्याबाबत माहिती आहे त्यासंबंधी बोल. तू आयपीएलसंबंधी ट्वीट करायला हवे’, असे ट्वीट ओमर अब्दुल्ला यांनी केले आहे.

दरम्यान, गौतम गंभीर आता ओमर अब्दुल्ला यांच्या ट्वीटला काय उत्तर देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गंभीरला भाजपकडून दिल्लीतून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.