‘भारत-पाक’मध्ये ‘आण्विक’ युध्द झाल्यास कोणाचा किती होऊ शकतो ‘विध्वंस’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर मधून ३७० हे कलम हटवल्या पासून पाकिस्तानचा तिळपापड उडाला आहे. जगभरातील देशांकडून पाकिस्तान मदतीची अपेक्षा करत आहे. मात्र कोणाकडूच पाकला या बाबतीत मदत मिळत नाहीये. त्यामुळे निराश झालेला पाकिस्तान आणि प्रधानमंत्री इम्रान खान पुन्हा – पुन्हा भारताला अणुयुद्धाची धमकी देत आहेत. मध्यंतरी इम्रान खान म्हणाले कि, दोन्ही देश अण्वस्त्रांनी सज्ज आहेत. जर हे प्रकरण युद्ध होण्यापर्यंत पोचले तर याने पूर्ण जग प्रभावित होईल.

भारताने मागच्या अनेक वर्षांपासून अण्वस्त्रांचा आधी वापर करणार नसल्याचे जाहीर केले आहे. परंतु, काही दिवसांपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी परिस्थितीनुसार भारत आपल्या रणनीतीमध्ये बदल करू शकतो असे वक्तव्य केले होत. ‘नो फर्स्ट यूज’ या भारताने स्वीकारलेल्या धोरणानुसार दुसऱ्या एखाद्या देशाने अण्वस्त्रांचा प्रथम वापर केला तरच भारत याचा वापर करेल. परंतु, पाकिस्तान ने आजपर्यत अण्वस्त्रांच्या वापराबाबत कुठलेही धोरण जाहीर केले नाहीये.
modi-and-imran-khan
पारंपरिक जमिनीवरील युद्धात पाकिस्तानी सेनेचा भारताच्या सेनेसमोर कधीही निभाव लागणे शक्य नसल्यामुळे पाकिस्तान पुन्हा – पुन्हा भारताला अणुयुद्धाची भीती दाखवत असतो. ‘द पाकिस्तानी आर्मीज वे ऑफ वॉर’ या पुस्तकाचे लेखक सी क्रिस्टीन फाइ म्हणतात कि, पाकिस्तान कडे अशी सेना आहे. जी युद्धाची सुरुवात तर करत असते. मात्र युद्ध कधीच जिंकत नाही आणि त्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत. मात्र त्याचा वापर करू शकत नाहीत. या परिस्थतीत पाकिस्तान कडे एकच पर्याय शिल्लक राहतो. तो म्हणजे, भारताच्या विरोधात छुपे युद्ध सुरु ठेवणे.

तसं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशाकडचे अण्वस्त्र एकत्र केले. तर ते अमेरिका, रशिया, चीन यांच्याकडील अण्वस्त्रांच्या तुलनेत अतिशय कमी आहेत. परंतु ही अण्वस्त्र १९४५ साली जपान मध्ये वापरल्या गेलेल्या अणुबॉम्ब पेक्षा कितीतरी जास्त विध्वंसक आणि बलशाली आहेत. दुसऱ्या विश्व् युद्धानंतर कोणत्याही देशाने अण्वस्त्रांचा वापर केला नाहीये. तरी जगभरात एकूण १५,००० अण्वस्त्र आहेत. जर का या अण्वस्त्रांचा थोडासा जरी वापर केला गेला तर आपण कल्पना करू शकणार नाही. असा विनाश पाहायला मिळू शकतो. दोन्ही देश अण्वस्त्र संपन्न असल्यामुळे यांच्यात जर युद्ध झाले. तर दोन्ही देशांना याचा त्रास सहन करावा लागेल. भारत – पाकिस्तान अण्वस्त्र युद्ध परिस्थितीत दोन्ही देशांनी आपल्याकडील अर्धे जरी अण्वस्त्र वापरले तर तब्बल २.१० करोड लोक मारले जातील.

भारताची अण्वस्त्र क्षमता

भारताकडे तीनही आघाड्यांवरून अण्वस्त्र हल्ला करण्याची क्षमता आहे. जमीन, आकाश आणि समुद्रावरून अण्वस्त्र युद्ध करण्यास भारत पूर्णपणे सक्षम आहे. २०१८ मध्ये भारताची आण्विक शक्तीने परिपूर्ण असलेली पाणबुडी आयएनएस अरिहंत सैन्यात दाखल झाली आहे. भारताचे जमिनीवरून-जमिनीवर मारा करू शकणारे अग्नी-३ या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची रेंज ३,००० किमी पर्यंत आहे.

भलेही पाकिस्तान कडे भारतापेक्षा जास्त अणुबॉम्ब असले तरी ते अचूक लक्ष्य भेदण्यात तेवढे सक्षम नक्कीच नाहीयेत. पाकिस्तान नवीन बॅलिस्टिक मिसाईल निर्माण करत आहे. ज्याची मारक क्षमता २००० किमी आहे. पाकिस्तानकडे एकही अण्वस्त्र सज्ज पाणबुडी नाहीये. परंतु, भारताकडे आता ब्रह्मोस क्रूज मिसाइल आहे. जे जमीन, समुद्र ,आकाश कोठूनही डागले जाऊ शकते. हे पाकिस्तानी सैन्य छावण्यांना पण आपला निशाणा बनवू शकते.

स्टॉकहोम इंटरनेशनल पीस रिसर्च इंस्टिट्यूट (SIPRI) यांच्या नुसार, पाकिस्तानकडे १४०-१५० अणुबॉम्ब आहेत. तर भारताकडे १३०-१४० अणुबॉम्ब आहेत. भारताकडे ९ प्रकारचे ऑपरेशनल मिसाइल आहेत. ज्यामध्ये अग्नी-३ (३०००-५००० किमी ) ची क्षमता आहे.

भारताकडे पृथ्वी, अग्नी या मालिकेतील जमिनीवरून जमिनीवर मारा करू शकनाऱ्या बॅलिस्टिक मिसाईल ची संख्या ५६ आहे. ज्यात भारताची ५३ टक्के (१०६ बॉम्ब ) ची युद्ध सामग्री ठेवली गेली आहे. तसेच K-१५ सागरिका सब्मरीन्स बैलिस्टिक मिसाइल्स मध्ये १२ अण्वस्त्र उपलब्ध आहेत.

पाकिस्तान चा भौगोलिक आकार पाहता भारत इस्लामाबाद, रावळपिंडी, लाहौर, कराची आणि नौशेरा येथील पाकिस्तान आर्मी आर्म्ड कॉर्प्स हेडक्वॉर्टरला आपला निशाणा बनवेल. परंतु, काही विश्लेषक चेतावणी देत सांगतात कि, लाहोर आणि कराची वर जर अण्वस्त्र हल्ला झाला. तर तो केवळ पाकिस्तानी सीमेपर्यंत मर्यादित राहणार नाही.

२५० किमी ची रेंज असलेले भारताचे पृथ्वी हे मिसाईल २४ अण्वस्त्र घेऊन जाण्यासाठी बनवण्यात आले आहे. हे मिसाईल पाकिस्तान ची प्रमुख शहरे लाहोर, सियालकोट, इस्लामाबाद , आणि रावळपिंडी ला निशाणा बनवू शकतात. भारताकडे २० अग्नी आणि ८ अग्नी-२ मिसाईल आहेत ज्यांची मारक क्षमता क्रमशः ७०० आणि २००० किमी आहे. हे जवळ-जवळ पाकिस्तान मधील महत्वाची शहरे जसे कि, लाहौर, इस्लामाबाद, रावलपिंडी, मुल्तान, पेशावर, कराची, क्वेटा और ग्वादर याच्या पट्यात येतात.

भारताची मोठ्या पल्ल्याची मिसाईल अग्नि III, IV, आणि V हि सुद्धा पाकिस्तान च्या कोणत्याही इलाक्यात जाण्यास सक्षम आहेत. परंतु हि चीन सोबत युद्ध सदृश्य परिस्थितीत वापरण्यासाठी बनवली गेली आहेत. भारताकडे क्षेपणास्त्र वाहून नेऊ शकेल असे छोट्या पल्ल्याचे धनुष्य हे मिसाईल सुद्धा आहे. युद्ध परिस्थितीत भारतीय विमाने पाकिस्तानकडची ४५ टक्के युद्ध सामग्री चा मारा करू शकतात. भारतीय वायुसेनेचा जग्वार फाइटर बॉम्बर १६ अणुबॉम्ब नेऊ शकतो. तर फ्रान्समध्ये बनवले गेलेले शक्तिशाली ‘मिरज २०००’ हे ३२ अणुबॉम्ब नेऊ शकते.

इंडिया स्पेंड च्या एप्रिल २०१५ मध्ये आलेल्या रिपोर्ट नुसार, पाकिस्तान चे सुद्धा ६६ टक्के अणुबॉम्ब बॅलिस्टिक मिसाईल मध्ये तैनात केले गेले आहेत. ‘बुलेटिन ऑफ द एटोमिक साइंटिस्ट डेटा’ च्या अंदाजानुसार, पाकिस्तानकडील ६६ टक्के अण्वस्त्र सामग्री मिसाईल वर तैनात आहे. पाकिस्तान च्या हत्फ या बॅलिस्टिक मिसाईल सिरीज सुद्धा मोठी हानी पोहचु शकते. मुंबई मधील एक विचार समुदायाचे सदस्य समीर पाटील यांच्या म्हणण्यानुसार, जर पाकिस्तान मध्यम पल्ल्याची बॅलिस्टिक मिसाईल ने हल्ला केल्यास तो भारताच्या चार मुख्य महानगरांना दिल्ली, मुंबई, बेंगलुरू आणि चेन्नई यांना निशाणा करण्याचा प्रयत्न करतील. पाटील यांच्या म्हणण्यानुसार, पाकची मध्यम पल्ल्याची बॅलिस्टिक मिसाईल भारतीय सेनेच्या मुख्य कमांडला निशाणा बनवेल.

पाकिस्तान बैलिस्टिक मिसाइल प्रोग्राम वर नैशनल इंस्टिट्यूट ऑफ एडवांस्ड स्टडीज (NIAS) बेंगलुरु मध्ये २००६ मध्ये आलेल्या अहवालानुसार, पाकिस्तान जवळ-जवळ अर्धे अणुबॉम्ब गौरी मिसाईल ने पडू शकतो. या मिसाईल चा पल्ला १३०० किमी आहे. आणि दिल्ली, जयपूर, अहमदाबाद ,मुंबई, पुणे, नागपूर, भोपाळ, आणि लखनऊ त्याच्या पल्ल्यात येऊ शकतील. पाकिस्तान कडे जवळ-जवळ ८ वॉरहेड आहेत जे, शाहीन (FALCON II ) ने पडले जाऊ शकतात. या माध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक मिसाईल चा पल्ला २५०० किमी आहे. जे भारताच्या अधिकतर शहरांना आपल्या पल्ल्यात घेऊ शकतो. ज्यामध्ये पूर्वेकडील कोलकाता हे शहर सुद्धा येईल.

एका अंदाजानुसार , १६ वॉरहेड कमी पल्ल्याची बॅलिस्टिक मिसाईल गजनवी ने डागले जाऊ शकतात. याची मारक क्षमता २७० ते ३५० किमी आहे आणि अहमदाबाद, दिल्ली याचा निशाणा बनू शकतात. पाकिस्तानकडे अंदाजे १६ न्यूक्लियर टिप्ड शॉर्ट रेंज की बैलिस्टिक मिसाइल्स आहेत. ज्यामध्ये शाहीन १ ची रेंज ७५० किमी आहे. यांचा पल्ला लुधियाना, दिल्ली, जयपूर, आणि अहमदाबाद पर्यंत जाऊ शकतो.
पाकिस्तान कडे जवळ जवळ ६६० किमी रेंज असणारे नासर मिसाईल आहे. हे टैक्टिकल न्यूक्लियर मिसाइल्स भारतीय सेना च्या वाढत्या तुकड्यांना टार्गेट करू शकते. पाकिस्तान कडे ८३५० किमी बाबर क्रूज मिसाईल आहे जे अण्वस्त्र वाहून नेण्यासाठी सज्ज आहे.

पाकिस्तान २८ टक्के अणुबॉम्ब एयरक्राफ्टचा वापर करून डागले जाऊ शकतात. अमेरिकेमध्ये बनवलेले F-16 A/B एयरक्राफ्ट २४ बॉम्ब एकत्र डागू शकते. त्याच ठिकाणी फ्रान्समध्ये बनवले गेलेले मिराज III/V एका वेळेस १२ बॉम्ब टाकू शकते.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like