… तर मुशर्रफ यांचा मृतदेह 3 दिवस इस्लामाबाद मधल्या चौकात लटकवून ठेवा : न्यायालय

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दोन दिवसांपूर्वी देशद्रोहाच्या आरोपाखाली पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने सविस्तर १६७ पानी निकालपत्र जाहीर केले असून त्यात नमूद केले आहे की शिक्षा होण्याआधी मुशर्रफ यांचा मृत्यू झाला तर इस्लामाबादच्या डी-चौकात त्यांचा मृतदेह तीन दिवस लटकवून ठेवण्यात येईल. तसेच यासाठी सुरक्षा यंत्रणा अधिक कडक करण्यात यावी याचे देखील आदेश देऊन फरार असलेल्या दोषी गुन्हेगाराला पकडून आणण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी सज्ज राहावे आणि कायद्यानुसार शिक्षेची अंमलबजावणी करावी. असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

मुशर्रफ यांना मंगळवारी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वकार अहमद सेठ यांच्या नेतृत्वाखाली त्रिसदस्यीय विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने २ विरुद्ध १ मताने हा निकाल दिला. कारण मुशर्रफ यांनी गुन्हा केलाय यावर न्यायाधीश अकबर यांचे मत विरोधात होते. तर न्यायाधीश सेठ आणि करीम यांचे एकमत होते. निकालपत्राच्या पॅराग्राफ ६६ मध्ये मुशर्रफ यांचा मृतेदह खेचून आणावा व तीन दिवस लटकवून ठेवावा असे नमूद केले आहे. परंतु न्यायाधीश करीम पॅराग्राफ ६६ बरोबर सहमत नाहीत.

मुशर्रफ यांच्यावर सध्या दुबईमध्ये वैद्यकीय उपचार सुरु आहेत. दरम्यान त्यांनी एक व्हिडीओ संदेश मध्ये म्हटले आहे की, “आपल्याविरोधातील सर्व आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित आहेत. या खटल्यातील विशेष बाब म्हणजे आरोपीला आणि त्याच्या वकिलांना आपली बाजू मांडण्याचीच संधी दिली नाही.”

काय आहे प्रकरण?
३ नोव्हेंबर २००७ रोजी देशात परवेझ मुशर्रफ यांनी आणीबाणी लागू केली होती. आणि याच दरम्यान न्यायाधिशांनाही अटक केली. आणि यामुळेच परवेझ मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला होता. मुशर्रफ यांच्यावर २०१३ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून ३१ मार्च २०१४ रोजी आरोपपत्र ठेवण्यात आले. दरम्यान परवेझ मुशर्रफ हे दुबईला आहेत आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. यामुळे त्यांना दिलेली फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी कशी पूर्ण होते यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/