जर तुम्ही ब्रश करण्यापूर्वी ‘टूथब्रश’ पाण्यात ‘भिजवत’ असाल तर ‘हे’ नक्की वाचा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टूथब्रश आपल्या रोजच्या वापरातील भाग आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की जर ब्रश व्यवस्थित स्वच्छ केला नाही तर टूथब्रश घरातील तिसरी सर्वात अस्वच्छ वस्तू ठरते. अस्वच्छ ब्रशमुळे डायरिया किंवा त्वचेचे आजार देखील होऊ शकतात. अशावेळी दात तंदुरुस्त ठेवण्यासाठी टूथब्रश देखील स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.

अनेक लोक दात साफ करताना पहिल्यांदा टूथब्रश पाण्यात भिजवतात. जेव्हा आपण ब्रश करण्यापूर्वी टूथब्रश ओला करतो तेव्हा तो मऊ होतो. यामुळे दातांनी ब्रश करण्याची क्षमता कमी होते. डॉक्टरांचे म्हणणे आहे की असे करणे योग्य नाही, यामुळे टूथब्रश देखील खराब होतो आणि दात देखील योग्य पद्धतीने साफ होत नाही.

ओल्या टूथब्रशवर पेस्ट लावल्याने पेस्ट पातळ होते, ज्यामुळे तिचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे दातांना ब्रश करण्यापूर्वी टूथब्रश ओला करु नये आणि जर करणारच असाल तर एक सेकेंदापेक्षा जास्त वेळ पाण्यात भिजवू नये.