फरारी RTI कार्यकर्ता रविंद्र बर्‍हाटेबाबत माहिती मिळाल्यास या नंबरवर कळवावी, पुणे पोलिसांचं आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे फरार असून, त्याची माहिती मिळाल्यास किंवा असल्यास ती त्वरीत पुणे पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी रवींद्र बऱ्हाटेसह दीप्ती आहेर, देवेंद्र जैन, शैलेश जगताप, अमोल चव्हाण यांच्या विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांनी तक्रार दिली आहे.

याप्रकरणात ८ आरोपीं विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. बऱ्हाटे आणि साथीदारांविरोधात शहरातील इतर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर त्याला फरार घोषित केले आहे. पुणे पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पण त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. यामुळे आता नागरिकांना बऱ्हाटेबाबत काही माहिती असल्यास कोथरूड पोलीस ठाण्यात (दूरध्वनी- ०२०- २५३९१०१० किंवा २५३९१५१५) देण्याचे आवाहन केले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like