काय सांगता ! होय, घरबसल्या जिंका 5 कोटींचे बक्षीस, ब्लॅक मनी अन् बेनामी मालमत्ता पकडून द्या, ‘इथं’ करा तक्रार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयकर विभागाने काळा पैसा, बेफाम संपत्ती किंवा कर चोरी करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी एक नवी शक्कल लढवली आहे. विभागाने एक नवीन ऑनलाईन सुविधा सुरु केली असून यावर काळा पैशाबाबत माहिती देता येणार आहे. विशेष म्हणजे माहिती देणाऱ्यास ५ कोटी रुपये बक्षिसही देण्यात येणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) ने मंगळवारी ही लिंक सुरु केली आहे. सीबीडीटीने सांगितले की ई-फाइलिंग पोर्टल https://www.incometaxindiaefiling.gov.in वर सोमवारपासून ‘कर चोरी किंवा बेनामी मालमत्ता’ची लिंक सुरु केली आहे.

या सुविधेंतर्गत ज्याच्याकडे पॅन किंवा आधार नंबर आहे किंवा ज्याच्याकडे पॅन, आधार नंबर नाहीय तो देखील तक्रार दाखल करू शकणार आहे. या ऑनलाईन सुविधेमध्ये ओटीपी आधारित प्रक्रियेंतर्गत कोणीही आयकर कायदा १९६१ चे उल्लंघन, अघोषित संपत्ती कायदा आणि बेनामी व्यवहार कायद्यांतर्गंत तीन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये तक्रार दाखल करता येणार आहे.

५ कोटींचे बक्षिस
तक्रार दाखल केल्यानंतर प्रत्येक तक्रारीचा एक विशिष्ट नंबर असणार आहे. तक्रारदार वेबलिंकवर त्याने केलेल्या तक्रारीवरील कारवाई पाहू शकतो. या सुविधेद्वारे कोणीही व्यक्ती अगदी तिथे काम करणारा, नातेवाईक, कार्य़कर्ता आयकर विभागाचा गुप्तहेर बनू शकणार आहे. त्याला बेनामी संपत्ती प्रकरणात १ कोटी तर विदेशांमध्ये काळेधन ठेवणाऱ्यांची माहिती दिल्यास काही अटींसह 5 कोटी रुपयांचा पुरस्कार देण्याची सोय करण्यात आली आहे.