IGNOU June TEE exam 2020 : ‘इग्नू’ने सर्व परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू) ने आपल्या सर्व परीक्षा पुढील आदेशांपर्यंत स्थगित केल्या आहेत. इग्नू यासंदर्भात परीक्षेच्या 15 दिवस आधी माहिती देईल, असे संस्थेने म्हटले आहे. इग्नूचे कुलपती प्रो. नागेश्वर राव यांनी सांगितले की विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याकडे लक्ष केंद्रित केले जाईल. विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यासाठी विद्यापीठाने असाइनमेंट, परीक्षा फॉर्म जमा करणे आणि पुन्हा प्रवेश घेण्याच्या तारखा आधीच 31 मे पर्यंत वाढविल्या आहेत.

प्रो. नागेश्वर राव म्हणाले, कोविड -19 आणि लॉकडाऊनमुळे 1 जूनपासून सुरू होणारी जून 2020 ची टर्म परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची नवीन तारीख नंतर निश्चित होईल.’

कुलगुरू मंगळवारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संबोधितही करतील. असाइनमेंट सबमिशन, परीक्षा फॉर्म सबमिशन आणि पुन्हा प्रवेशासाठी सुधारित तारखांविषयी विद्यार्थी इग्नूच्या वेबसाइट www.ignou.ac.in वर देखील भेट देऊ शकतात.

इग्नू व्हिडीओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून प्रिंट, डिजिटल, मल्टीमीडिया सामग्री व्यतिरिक्त ऑनलाइन वर्ग देखील आयोजित करीत आहे. तसेच एमएचआरडीच्या स्वयं पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रदान करणार आहे.