IIFA 2020 : ‘आयफा’साठी जमवलेले 700 कोटी ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईसाठी वापरणार मध्य प्रदेश सरकार !

पोलीसनामा ऑनलाईन :मध्य प्रदेशात होणाऱ्या आयफा इव्हेंटसाठी अलॉट करण्यात आलेले पैसे सीएम फंडमध्ये ट्रान्सफर करण्यात आले आहेत. आता पैसा कोरोनाविरोधातल्या लढ्यासाठी वापरला जाणार आहे. आधी मध्य प्रदेशातील माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं आयफासाठी याची अलॉटमेंट केली होती. आता शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारनं याला पुन्हा सीएम फंडात ट्रान्सफर करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री ऑफिसच्या अधिकृत ट्विटरवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे. ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, मध्य प्रदेशात आयफाचं आयोजन होणार होतं. सध्या सुरू असणाऱ्या COVID-19 च्या संकटामुळं जर आयफावर खर्च होणारी रक्कम ही मुख्यमंत्री मदत निधीसाठी दिली तर यामुळं जनतेल मोठी मदत होईल.”

मुख्यमंत्री होण्याआधी शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशात होणाऱ्या या मेगा इव्हेंटचा विरोध केला आहे. फेब्रुवारीत ते म्हणाले होते की, “मध्य प्रदेशात राडा झाला आहे. प्रशासकीय अनागोंदी आहे. जनकल्याण आणि विकासासाठी पैसे नाहीत. परंतु सरकार मात्र आयफा करत आहे. हे सरकार फक्त योजना बंद करण्याचं काम करत आहे. जनताही उध्वस्त आणि प्रेदेशही उध्वस्त.”