‘भाईजान’ सलमानच्या पाठोपाठ कुत्र्याची समारंभात ‘एन्ट्री’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडच्या दबंग सलमान खानची फॅन फॉलोईंग कोणापासून लपलेली नाही. आपली शैली, उत्साही व्यक्तिमत्त्व आणि प्रेमळ स्वभाव यामुळे सलमान नेहमीच चर्चेत असतो.

काल रात्री आयफा पुरस्कार 2019 मुंबईत पार पडला. फंक्शनमध्ये सर्व कलाकारांनी धमाकेदार एन्ट्री केली. यादरम्यान, अवॉर्ड शोमध्ये एक मजेदार किस्सा घडला. या मजेदार घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अवॉर्ड नाईटमध्ये सलमान खानने मांजरेकर यांच्यासोबत दबंग स्टाईलमध्ये प्रवेश केला पण सलमान खान ग्रीन कार्पेटवर येताच. एका कुत्र्याने सलमानच्या मागे लगेच एन्ट्री केली. हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगला व्हायरल होत आहे.

IIFA अवॉर्ड्सच्या ग्रीन कार्पेटवर सलमानने माध्यमांशी संवाद साधला. जेव्हा मीडियाने त्यांच्या ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटाबद्दल विचारले गेले तेव्हा तो म्हणाला की, इंशाअल्लाह आता बनवला जात आहे. मी त्या चित्रपटात नाही.

संजयलीला भन्साळीसोबत सलमान खान ‘इंशाअल्लाह’ चित्रपटात दिसणार होता. पण संजय आणि सलमान यांच्यात एका विषयावरुन वाद निर्माण झाला होता. यामुळे सलमान खानने हा चित्रपट सोडला आहे. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे.

View this post on Instagram

Woh mere peche wire kis cheez ka hai . . Can u guess pls?

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like