‘IIT’ शिक्षणासाठी अणुराधा हराळे हीला हर्षवर्धन पाटील यांचेकडून १ लाखाची मदत

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – भारतीय तंत्रज्ञान संस्था (आय आय टी) या स्वायत्त शैक्षणिक संस्था असुन इंदापूर शहरातील कु. अनुराधा रमेश हराळे ही भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) गुवाहाटी, आसाम येथे इंजिनिअरिंग साठी प्रवेश मिळविणारी इंदापूरातील पहिलीच विद्यार्थीनी आहे.

भारतात तिचा २२५९० तर अनुसुचित जातीमध्ये ६२७ वा क्रमांक आला आहे. राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील व जि. प. सदस्या अंकिता पाटील यांनी इंदापूर येथिल रोहिदास नगरमध्ये तिच्या राहत्या घरी जाऊन तीच्या पुढील शिक्षणासाठी तीला एक लाख रूपये आर्थिक मदत म्हणून देण्यात आले. व तीचा नागरी सत्कार करण्यात आला.

अणूराधा हराळे हीची घरातील आर्थिक परिस्थिती हलाखीची व नाजुक आहे. तिला उच्च पदस्थ अधिकारी होण्याची महत्वकांक्षा लक्षात घेऊन हर्षवर्धन पाटील व मित्र परिवाराच्या वतीने एक लाख रूपयांची मदत करण्यात आली. नारायणदास रामदास हायस्कूल मध्ये तिचे पाचवीपर्यंतचे शिक्षण तर सहावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण शिक्रापूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात झाले आहे. इयत्ता बारावीला तिला ९५.८० टक्के मिळाले आहेत. जेईई अँडव्हान्स मध्ये ९७ मार्क मिळाले.

यावेळी इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा, कैलास कदम, जावेद शेख, विजय हराळे, अशोक हराळे, संतोष शेवाळे, नवनाथ शेवाळे, बाळासाहेब कांबळे, रमेश धोत्रे, नितीन मखरे, राजेंद्र शेवाळे, विजय शेवाळे, सुनिल गलांडे, अनिल साठे, डॉ. संजय शिंदे, शिवाजी शिंद, उपस्थित होते.

आरोग्यविषय वृत्त –

पिळदार शरीरयष्‍टी घडवण्यासाठी ‘हे’ उपाय करा
मॅनिक्युअरचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे
अपचनापासून ते मुरूम दूर कारण्यासाठी ‘पपई’ फायदेशिर
मुडदूस होण्याची ‘ही’ आहेत लक्षणं, जाणून घ्या
निरोगी राहण्यासाठी पावसाळ्यातील आयुर्वेदिक उपाय,जाणून घ्या
डायबिटीज नियंत्रित करायचा आहे ? मग नक्की करा हे घरगुती उपाय
दोरीवरील उडया मारण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या