कोट्यवधींच्या गौण खनिजाचे बेकायदा उत्खनन ; चौकशीसाठी विशेष पथक नियुक्त

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता व पिंपळगाव माळवी शिवारात झालेल्या बेकायदा गौणखनिज उत्खननाबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश नगरच्या तहसीलदारांनी दिले आहेत. त्यासाठी सहा जणांचे विशेष पथकही नियुक्त केले आहे.

वडगाव गुप्ता व पिंपळगाव माळवी येथे बेकायदा होणाऱ्या गौणखनिज उत्खननाचा पंचनामा करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, यासाठी वडगाव गुप्ता येथील श्रीमती राधाबाई ढेरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे १५जून २०१९ रोजी गौणखनिज उत्खननाबाबत तक्रार केली होती. या तक्रारीनुसार जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी नगर तहसीलदारांना पत्र पाठवून, संबंधित मंडलाधिकारी, तलाठी तसेच भूमिअभिलेख विभागाचे तालुका निरीक्षक व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रतिनिधींचे पथक तयार करून संबंधित गौणखनिज उत्खनन जागेचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित दोषींवर नियमानुसार कारवाई करून अहवाल देण्याचे स्पष्ट केले होते. या पत्रानुसार तहसीलदारांनी सहा जणांचे पथक यासाठी नियुक्त केले आहे.

पथकात यांचा समावेश –

यात तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार, नगर तालुक्याच्या भूमि अभिलेख विभागाचे तालुका निरीक्षक, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता, सावेडीचे मंडलाधिकारी तसेच वडगाव गुप्ता व पिंपळगाव माळवी गावांचे तलाठी यांचा समावेश आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like