जतमध्ये बेकायदा विदेशी मद्य जप्त, दोघांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

जतसह शेगाव येथे राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने छापा टाकून अवैध दारू वाहतूक करणारे दोन टेम्पो जप्त केले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 8 लाख 69 हजार 512 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान विदेशी मद्याचा वाहतूक पास नसल्याने शेगावमधील हॉटेल रायगड व रजिस्टर नसल्याने शेगावमधील चौगुले देशी दारू दुकान व जतमधील बामणे दारू दुकानावरही कारवाई करण्यात आली.
[amazon_link asins=’B00NFJGUPW,B076HYJT12′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6459c94a-b909-11e8-9c95-61a608691951′]

राजेंद्र प्रल्हाद गुदळे (वय 33, रा. काशिलिंगवाडी), बसवराज अर्जुन वनखंडे (वय 33, रा. बालिगिरी, अथणी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शेगाव येथील हॉटेल रायगडसमोर राजेंद्र गुदळे याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक टेम्पो, देशी, विदेशी मद्याच्या बाटल्या असा 2 लाख 23 हजार 122 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तेथेच बसवराज वनखंडे यालाही अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक टेम्पो, देशी, विदेशी मद्याच्या बाटल्या असा 6 लाख 46 हजार 390 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान शेगावमधील हॉटेल रायगड, चौगुले देशी दारू दुकानावरही कारवाई करण्यात आली. तर जतमधील बामणे देशी दारू दुकानावरही कारवाई करण्यात आली. उत्पादन शुल्कच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आनंद पवार, उमेश निकम, युवराज कांबळे, करण सरवदे, स्वप्नील कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
[amazon_link asins=’B06Y5L25M4,B006RHKER4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6996bab5-b909-11e8-a128-1d6cfcecc05c’]

राज्य उत्पादन शुल्कने शुक्रवारी केलेल्या या कारवाईत केवळ वाहनचालकांनाच अटक केली आहे. मात्र बेकायदेशीररित्या जत परिसरात मद्य पाठवणारा मोठा मासा नामानिराळाच राहिला आहे. त्याच्याकडून जत परिसरात सातत्याने विनापरवाना, बेकायदा दारूची तस्करी केली जाते. या मोठ्या माशापर्यंत उत्पादन शुल्कचे अधिकारी पोहोचणार का असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी