illegal lending apps | सावधान ! देशात 600 पेक्षा जास्त ‘अवैध’ कर्ज देणारी अ‍ॅप्स, यांच्याकडून पैसे घेणे टाळा; जाणून घ्या

नवी दिल्ली : illegal lending apps | देशात सध्या 600 पेक्षा जास्त कर्ज देणारी अ‍ॅप्स (illegal lending apps) सुरू आहेत आणि ती अ‍ॅप स्टोअरवर (app store) सुद्धा उपलब्ध आहेत. जर तुम्ही याचा वापर केलात तर मोठे नुकसान होऊ शकते. केंद्र सरकारने सोमवारी एका वक्तव्यात याबाबत माहिती दिली आहे.

 

केंद्रीय अर्थ मंत्रालयाद्वारे लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात म्हटले आहे की, भारतीय रिझर्व्ह बँकांच्या निष्कर्षांनुसार (RBI) 600 पेक्षा जास्त अशी अ‍ॅप्स आहेत.

 

या खुलाशानंतर आता देशात डिजिटल लेंडिंग अ‍ॅप्सवर (Online Loan Apps) कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. RBI द्वारे जानेवारीमध्ये स्थापन एका समितीने ग्राहकांच्या हिताच्या सुरक्षेसाठी एक नोडल एजन्सी स्थापन करण्याचा सल्ला दिला आहे. (illegal lending apps)

 

आरबीआयच्या रिपोर्टनुसार, काही दिवसांपासून डिजिटल लोन फसवणूक वाढत आहे. डिजिटल लेंडिंग अ‍ॅप्स विरूद्ध जानेवारी 2020 पासून मार्च 2021 पर्यंत 2500 पेक्षा जास्त तक्रारी प्राप्त झाल्या, ज्यामध्ये सर्वात जास्त प्रकरणे महाराष्ट्रात समोर आली. यानंतर कर्नाटक, दिल्ली, हरियाणा, तेलंगाना, आंध्र प्रदेश, यूपी, पश्चिम बंगाल, तमिळनाडुच्या लोकांची फसवणूक झाली.

 

 

रिझर्व्ह बँकेने जानेवारी, 2021 मध्ये डिजिटल माध्यमासह ऑनलाईन व्यासपीठ आणि मोबाईल अ‍ॅपद्वारे लोन देण्याबाबत
कार्यकारी संचालक जयंत कुमार दास यांच्या अध्यक्षतेखाली एक वर्किंग गु्रप स्थापन केला होता.

 

डिजिटल लोन प्रकरणांमध्ये निर्माण होणारे व्यावसायिक वर्तन आणि ग्राहकांच्या सुरक्षेविषयी चिंता लक्षात घेऊन या वर्किंग ग्रुपची स्थापना करण्यात आली होती, ज्याने आपल्या सूचना दिल्या आहेत. आरबीआयने सुद्धा जनतेची फसवणूक होऊ नये यासाठी अशा प्लॅट फॉर्मवर लक्षण ठेवण्यास सांगितले होते.

 

Web Title :- illegal lending apps | over 600 illegal lending apps operating in india says indian government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा