‘त्या’ कॉफी शॉपवर चालायच्या ‘भानगडी’ अन् कॉफी सोडून बरंच काही….

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – नांदेड येथील कौठा परिसरातील कॉफीशॉपच्या नावाखाली गैरप्रकार चालू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामीण पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ही माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी कॉफीशॉपचा मालक व अन्य तीन जोडप्यांना ताब्यात घेण्यात आले असून पकडलेले सर्वजण २० ते २३ वयोगटातील असल्याची माहिती मिळाली आहे.

नांदेड : दांडिया खेळणाऱ्या महिलांचे व्हिडिओ अन् उठल्या लाठ्या-काठ्या आणि तलवारी

यापूर्वी पोलिसांनी पावडेवाडी भागात धाड सत्र राबवून कारवाई करून जवळपास पंधरा कॉफीशॉपचे परवाने रद्द केले होते. नवीन नांदेड शहरातील कौठा भागात कॉफीशॉप वाढत चालले आहेत. या कॉफीशॉपमध्ये गैरप्रकार चालत असल्याची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशनला मिळाली. पोलीस उपअधिक्षक धनंजय पाटील व पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक एस.कदम व गोविंद खैरे यांच्या पथकाने कौठा भागातील “एफयू” या कॉफी शॉपवर धाड टाकली असता , सदर गैरप्रकार उघडकीस आला. या प्रकारात आवश्यक पुराव्यासह कॉफीशॉपचा मालक व अन्य तीन जोडप्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच पकडण्यात आलेले सर्वजण २० ते २३ वयोगटातील असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे : धक्कादायक… वडिल,आजी-आजोबा अन् काकांच्या निष्काळजीपणामुळे ‘त्या’ चिमुरड्यांचा मृत्यू

या कारणाने टाकली धाड –

कॉफीशॉप केवळ मुलामुलींना भेटण्यासाठी असलेला पॉईंट आहे तसेच दिवसभरात बारा तास चालणारी कॉपी शॉप कोणत्याही प्रकारची कॉफी न विकता वीस-तीस हजार रुपयांचा गल्ला जमवत आहे , अशी माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीसांनी पावडेवाडी परिसरात असणाऱ्या कॉफी शॉपवर धाडी टाकली. पोलीसांना या धाडीत कॉफी शॉपवर चमचाभर कॉफीही सापडली नाही आणि कॉफी बनविण्याची उपकरणे देखील सापडली नाहीत. तसेच या कॉफी शॉपवर बेड पद्धतही आढळली. याप्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता हा गैरप्रकार उघडकीस आला. पावडेवाडी भागातील नागरिका पोलीस प्रशासनाच्या मदतीने आपल्या भागातील गैरप्रकार बाहेर काढता येईल यासाठी पुढे सरसावले आहेत. सदर प्रकरणावर पोलीस अधिक्षक काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

समाजात गैरप्रकार वाढीची करणे –

पालकांकडून अमर्यादित मिळणारा पॉकेट मनी आणि मुलांच्या जीवावर मॉडर्न लाईफसाठी नको त्या ऑफरला बळी पडणाऱ्या मुली त्यामुळे समाजात गैरप्रकार वाढत चालले असल्याची माहिती समोर येत आहे.