8 राज्यांमध्ये आकाशातून होणार संकटाचा वर्षाव! IMD ने 1 डिसेंबरपर्यंत दिला जोरदार पावसाचा इशारा; जाणून घ्या महाराष्ट्रा संदर्भातील पावसाचा अंदाज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था IMD | एकीकडे उत्तर भारतात (North India) थंडी (Winter) सुरू झाली आहे तर दुसरीकडे दक्षिण भारतात (South India) पावसाचा (Rain) कहर सातत्याने सुरू आहे. हवामान विभागाने (IMD) अंदाज वर्तवला आहे की, 1 डिसेंबरपर्यंत भारतातील 8 राज्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस (Heavy Rainfall) होऊ शकतो.

 

या राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता

 

भारतीय हवामान शास्त्र विभागानुसार (India Meteorological Department), तामिळनाडु (Tamil Nadu), पुदुचेरी (Puducherry),
केरळ (Kerala), आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) आणि लक्षद्वीप (Lakshadweep) मध्ये 1 डिसेंबरपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

 

कोमोरिन क्षेत्र (Comorin Area) आणि श्रीलंकेच्या (Sri Lanka) समुद्र किनार्‍याजवळ एक चक्रीवादळ (Cyclone) आहे आणि यावेळी उत्तर-पूर्व वारे (North-East Wind) सुद्धा सुरू आहेत.
या कारणामुळे पाऊस या राज्यांमध्ये परिणाम दाखवू शकतो.
याशिवाय 29 नोव्हेंबरला अरबी समुद्रात सुद्धा चक्रीवादळ निर्माण होऊ शकते.
ज्यामध्ये गुजरात (Gujarat), गोवा (Goa) आणि महाराष्ट्रात (Mahrashtra) पाऊस होऊ शकतो.

 

हवामान विभागाने दिला इशारा

 

या दरम्यान हवामान विभागाने (IMD) इशारा दिला आहे की,
मच्छिमारांनी मासे पकडण्यासाठी समुद्रात जाऊ नये. अन्यथा जीव संकटात सापडू शकतो.

 

तामिळनाडुत पावसाचा कहर

 

शनिवारी सुद्धा तामिळनाडुच्या अनेक जिल्ह्यात पाऊस झाला, ज्यामध्ये चेंगलपट्टु (Chengalpattu), कुड्डलोर (Cuddalore), थिरूवल्लूर (Tiruvallur),
कांचीपुरम (Kancheepuram), चेन्नई (Chennai), करईकल (Karaikal) आणि मईलादुथुदरई (Mayiladuthudrai) चा समावेश आहे.
पावसामुळे तामिळनाडुमध्ये आतापर्यंत 8 लोकांचा मृत्यू झाला आहे.

 

पावसामुळे तामिळनाडु आणि केरळमध्ये पूरसदृश्य स्थिती (Flood Like Situation) आहे.
लोकांना घरातून बाहेर पडताना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
हवामान विभागाने सुद्धा म्हटले की, खुप आवश्यक असेल तरच घरातून बाहेर पडा.

 

Web Title : IMD | imd predicts heavy rain in eight states of india till one december weather news tamil nadu kerala Know the rainfall forecast for Maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Shashikant Shinde | शिवेंद्रसिंहराजेंची राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंवर खरमरीत टीका, म्हणाले…

SGB Scheme | सरकारच्या ‘या’ योजनेतून स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी, येथे जाणून घ्या कधी होईल सुरुवात

Sanjay Raut | संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना ‘रोखठोक’ सवाल, म्हणाले – ‘नव्या सरकारचा शपथविधी मध्यरात्री की पहाटे?’