Sanjay Raut | संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना ‘रोखठोक’ सवाल, म्हणाले – ‘नव्या सरकारचा शपथविधी मध्यरात्री की पहाटे?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन राज्यातील महाविकास आघाडी सरकारला (Maha Vikas Aghadi Government) दोन वर्षे पूर्ण झाली. तसेच विरोधी पक्षांकडून रोज सरकार पडण्याचे भाष्य केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘रोखठोक’ सदरातून टीकेचे बाण सोडले आहेत. ठाकरे सरकारला (Thackeray Government) दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. तर त्याच वेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहाटे घेतलेल्या शपथविधीलाही दोन वर्षे पूर्ण झाली. गेल्या दोन वर्षात सरकार न पाडू शकणारा विरोधी पक्ष आजही सरकार पाडण्याची नवी तारीख देत आहे हा विनोद म्हणावा लागेल. असा टोला राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला लगावला आहे. राज्यातील विरोधी पक्ष ठाकरी बाण्याने दिशाहीन झाला आहे. राजकारणात खोटेपणाचा जय होतोच असे नाही. विरोधी पक्षाने नक्की काय गमावले?, असेही राऊत म्हणाले.

 

पहाटेच्या शपथविधीला दोन वर्षे

 

महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण होत असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे घेतलेल्या शपथविधी सोहळ्याला ही दोन वर्षे झाली.
पाठीच्या दुखण्यामुळे सध्या मुख्यमंत्री ठाकरे रूग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती उत्तम आहे.
पण दोन वर्षांत प्रकृती बिघडली आहे. ती राज्यातील विरोधी पक्षाची, असे म्हणत त्यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला.

 

सरकारला दोन वर्षे झाली तरी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) अजूनही ठाकरे सरकार आता लवकरच पडेल!’
असे म्हणतात म्हणजे तारखा देण्याच्या फंदातून व छंदातून भाजप अद्याप बाहेर पडलेला नाही.
ठाकरे सरकार पडणार व पुन्हा आम्ही शपथ घेणार, असे पाटील यांना वाटत असेल तर कोणाला वाईट वाटण्याचे कारण नाही.
त्यांनी इतकच स्पष्ट केले पाहिजे की, नव्या सरकारचा शपथविधी ते मध्यरात्री करणार की पहाटे? काही दिवसांपूर्वी पक्षाची कार्यकारिणी झाली.
त्यामध्ये हेच पाटील म्हणाले की, सरकार पडेल व आम्ही सत्तेवर येऊ या भ्रमातून पक्षाने आता बाहेर पडले पाहिजे.
आता विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडावी लागेल. आणि आता तेच पाटील चार दिवसांत ठाकरे सरकार पडेल असे छातीठोकपणे सांगतात.

गेल्या दोन वर्षांपासून मुख्यमंत्री ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे सगळ्यांना पुरून उरले आहेत.
ठाकरे सरकारला बदनाम करण्यासाठी व कोंडीत पकडण्यासाठी दोन वर्षापासून विरोधकांनी कोणतीच कसर सोडली नाही.
ज्याला राजकारणात ‘बिलो द बेल्ट’ म्हटले जाते ते सर्व कमरेखालचे वार करूनही सरकार कायम असल्याचेही राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले.

 

Web Title : Sanjay Raut | shiv sena leader and MP sanjay raut criticize bjp Chandrakant Patil over government formation statement maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

IND Vs SA | टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर क्रीडा मंत्र्यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Vaishali Agashe | LIC च्या सातारा विभागीय कार्यालयाच्या खेळाडू वैशाली आगाशेंची जागतिक बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड

अवघ्या 25 हजारात येथे मिळेल स्टायलिश Hero Maestro, सोबत 12 महिन्यांचा वॉरंटी प्लान