खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षांवर हल्ला करणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करा

दौंड- (अब्बास शेख ) दौंड तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष लक्ष्‍मण पांडुरंग दिवेकर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी पंचायत समितीच्या माजी सभापतींसह सर्व आरोपींना त्वरित अटक करण्यात येऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दौंड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाने निवेदनाद्वारे यवत चे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांना केली आहे.

Advt.

सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पं.स. सभापती शिवाजी रामभाऊ दिवेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून दौंड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष लक्ष्मण पांडुरंग दिवेकर यांच्यावर  धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता हा हल्ला दौंड तालुक्यातील कडेठाण येथे यात्रेमध्ये करण्यात आला होता.

या हल्ल्याप्रकरणी  यवत पोलिसांनी माजी सभापती शिवाजी दिवेकर यांच्यासह सहाजनांवर बेकायदा जमाव जमवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.