Immunity Boost : कोरोना काळात ‘या’ 5 पद्धतीने वाढवा इम्यूनिटी, संसर्गाचा धोका होईल कमी

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसची दुसरी लाट खुपच भयंकर आहे. कोरोनाशी लढण्यासाठी इम्यूनिटी मजबूत असणे आवश्यक आहे. यासाठी पोषण भरपूर असलेला डाएट सेवन करा. कोरोना काळात इम्यूनिटी कशी वाढवू शकता ? इन्फेक्शनची रिस्क कशी कमी करू शकता? ते जाणून घेवूयात…

1 हायड्रेटेड
हायड्रेटेड राहण्यासाठी रोज 8-10 ग्लास पाणी प्या. शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतील.

2 चांगला डाएट
डाएटमध्ये हेल्दी फुड्सचा समावेश करा. भाज्या, पालेभाज्या, फळे सेवन करा.

3 ओमेगा 3 आणि 6 फॅटी अ‍ॅसिड
ओमेगा 3 आणि 6 फॅटी अ‍ॅसिडयुक्त सप्लीमेंटचे सुद्धा सेवन करू शकता. आहारात आले, आवळा, हळद, लसूण, तुलळशीची पाने, काळे जिरे यांचा समावशे करा. सूर्यफुलाचे बी, फ्लेक्स सीड, टरबूज आणि भोपळ्याचे बी सेवन करा.

4 चांगली झोप घ्या
रोज 7 से 8 तासांची झोप घ्या. यामुळे इम्यूनिटी वाढते.

5 व्यायाम करा
रोज 30 ते 45 मिनिटे व्यायाम करा. यामुळे टॉक्सीन्स बाहेर पडतील, मेटाबॉलिज्म चांगले होईल आणि शरीराची इम्यूनिटी वाढेल. तणाव कमी करण्यासाठी रोज मेडिटेशन करा.