सावधान ! तुमच्या घरात दुचाकी असली तरी देखील रेशन कार्ड रद्द होणार, सरकारचा नवा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तुम्ही दुचाकी आणि चारचाकी वापरत असाल आणि तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर हे कार्ड आता रद्द होणार आहे. म्हणजे जर तुमच्याकडे ही वाहने असतील आणि तुम्ही रेशनकार्डच्या आधारे स्वस्त धान्य खरेदी करत असालं तर आता तुम्हाला हा स्वस्त धान्य पुरवठा होणार नाही. एवढेच नाही तर तुमच्या शेतीचे उत्पन्न वाढलं तरी देखील तुमचे रेशन कार्ड रद्द होईल. राज्य सरकारच्या या मोठ्या आणि महत्वपुर्ण निर्णयामुळे जवळपास लाखांपेक्षा आधिक लोकांचे रेशनकार्ड रद्द होण्याची शक्यता आहे.

येवढे उत्पन्न असल्यास होईल रेशन कार्ड रद्द
रेशन कार्ड लाभार्थ्यांना शहरातील उत्पन्नाची अट ५९ हजार रुपये आहे. तर ग्रामीण भागात ही अट ४४ हजार रुपये आहे. म्हणूनच सरकारने दुचाकी किंवा चारचाकी वापरणाऱ्यांना श्रीमंत समजून त्यांना रेशन दुकानातून धान्य मिळणार नाही.

राज्यात आधार लिंक असलेले जवळपास दीड कोटी पेक्षा आधिक रेशनकार्ड धारक आहेत. या लोकांच्या शिक्षा पत्रिका रद्द झाल्यास त्यांना स्वस्त धान्य मिळणार नाही. यांना या सुविधेची गरज नाही असे समजून सरकार नव्या गरजू लाभार्थांना रेशनकार्ड देणार आहे.

अशी गोळा होणार तुमची खरी माहिती
सरकारच्या या नव्या निर्णयानुसार रेशन कार्ड धारकांकडून माहिती लिहून घेतली जाणार आहे. यात देण्यात आलेल्या निकषांनुसार दुचाकी चारचाकी आणि शेतीत आधिक उत्पन्न असलेल्यांची माहिती गोळा करण्याचे काम प्रत्येक जिल्हात सुरु आहे. हे काम अन्न आणि पुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे. तुमच्याकडे असलेल्या वाहनांची तपासणी आरटीओ कडून गोळा करण्यात येत आहे. तर महसूल विभाग महसूल विभागाकडून शेतीतील उत्पन्नाची माहिती गोळा करण्यात येत आहे. परंतू या निर्णयाचा फटका त्या लाभार्थ्यांना बसणार आहे ज्यांच्याकडे दुचाकी वाहने आहेत. फक्त दुचाकी असल्याने त्यांना श्रीमंत समजून रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे.

आळूची ‘पाने’ आहेत अनेक आजारांवर गुणकारी

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात