प्रत्येकाला माहिती हवं ! रक्तातील महत्वाचे घटक व त्यांची कार्ये, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – रक्त हा जैविक द्रव पदार्थ लाल रक्त पेशी, पांढऱ्या रक्त पेशी आणि बिंबिका यांनी बनलेला आहे. या पेशींमधील ‘हिमोग्लोबिन’ घटकामुळे रक्त लाल रंगाचे दिसत असते. यामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण हे १०० मि.ली. मध्ये साधारण १५ ग्रॅम इतके असले पाहिजे. याचे प्रमाण जर कमी जास्त असेल तर रक्ताची प्राणवायू नेण्याची क्षमता कमी होते. रक्ताचा उगम अस्थिमज्जेमध्ये होतो. रक्तात लाल रक्तपेशींचे प्रमाण सर्वाधिक असते. प्रौढ व्यक्तींच्या शरीरात एकूण सुमारे पाच लिटर रक्त असते.

पुढीलप्रमाणे आहेत रक्त आणि रक्तपेशींची कार्ये –
1) रक्त हे शरीरात आलेल्या रोगजंतूंचा प्रतिकार करते.
2) शरीराचे तापमान सर्वत्र समान व कायम राखण्याचे कार्य रक्त करत असते.
3) रक्तातील पांढऱ्या रक्त पेशींमुळे संसर्गाला प्रतिबंध होतो तर बिंबिकांमुळे रक्ताची गुठळी होण्यास मदत होते.

4) रोगजंतू पकडून नष्ट करणे, रोगजंतूंबद्दलची माहिती घेऊन प्रतिकारशक्ती तयार करणे, जखम झाल्यास ती भरुन काढणे, रक्तस्राव थांबवणे अशी अनेक कामे पांढ-या पेशी करतात.

5) तांबडया पेशींमध्ये लोहयुक्त हिमोग्लोबिन (रक्तद्रव्य) असते, ते प्रामुख्याने प्राणवायू व कार्बवायू वाहून नेण्याचे काम करतात.

हिमोग्लोबिनमुळे प्राणवायू आणि कार्बन डायॉक्साइड रक्तात विरघळून त्यांचे वहन करणे सुलभ बनते.

Visit : Policenama.com