महत्वाची बातमी : मेट्रोच्या कामामुळे पुण्यातील वाहतुकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवाजीनगर परिसरामध्ये मेट्रोचे काम सरु करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातून होणारी वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे. वाहन चालकांनी पार्य़ायी मार्गाचा वापर करून पुणे वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे असे पुणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी केले आहे.

शिवाजीनगर एसटी स्टँड आऊट गेट पासून न.ता.वाडी कडे जाण्यास तसेच न.ता.वाडी कडून शिवाजीनगर एसटी स्टँडकडे येणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. तसेच शिमला ऑफिस कडून न.ता.वाडी कडे जाणा-या पीएमपीएमएल बसेस आणि इतर वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग खालील प्रमाणे

शिमला ऑफिस चौकातून – विर चाफेकर चौक – उजवीकडे वळून सरळ के एम जोशी पथ मार्गे न.ता.वाडी तसेच न.ता.वाडीकडून – वीर चाफेकर चौकातून इच्छीत स्थळी जावे.

नो-पार्किंग
शिवाजीनगर एसटी स्टँड आऊट गेट ते न.ता.वाडी चौकापर्यंत दोन्ही बाजुस नो-पार्किंग करण्यात आले आहे.

दळवी हॉस्पीटल ते देवी हाईट्स पर्य़ंत दोन्ही बाजूस नो पार्किंग करण्यात आले आहे.
देवी हाईट्स ते कृषी भवन (के.एम गांधी पथ) पर्यंत दोन्ही बाजुस नो पार्किंग करण्यात आले आहे.
वीर चाफेकर चौक ते न.ता.वाडी चौक (के.बी. जोशी) रोडवरील दोन्ही बाजुस नो पार्किंग करण्यात आली आहे.