आर्थिक अडचणींचा सामना करतोय इम्रान खान, वेगळं झालेली पत्नी अवंतिकानं यामुळं सोडलं घर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इम्रान खान सध्या आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सिनेमांतून गायब असणारा इम्रान अचानक चर्चेत आला जेव्हा त्याची पत्नी अवंतिका त्याच्यापासून वेगळी राहू लागली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अवंतिका आणि इम्रान खान यांचं लग्न आता अडचणीत आहे. दोघे का वेगळे झाले याचा आता खुलासा झाला आहे.

पिकंव्हिलाच्या रिपोर्टनुसार, अॅक्टींगमध्ये फ्लॉप झाल्यानंतर इम्रान खानला सिनेमाच्या ऑफर्स मिळणं कमी झालं. एक वेळ तर अशी आली की, जेव्हा त्याच्याकडे अजिबात काम नव्हतं. डायरेक्शनमध्येही त्याचा प्रयत्न फसला. गेल्या चार वर्षांपासून तो आपल्या घराता रिकामा बसला आहे. त्याच्याकडे आता कोणतेही काम नाही. अशा असफलतेमुळे इम्रानचा स्वभाव चिडचिडा झाला. त्याच्याकडचे पैसेही संपले. यामुळे पती-पत्नीमध्ये रोज भांडण होऊ लागलं. वाढत्या भांडणामुळे अवंतिकाने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. अवंतिकाला वाटत होतं की, मुलगी इमारावरही याचा वाईट परिणाम होत आहे. कुटुंबाने दोघांमध्ये समेट करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा काही फायदा झाला नाही.

आणखी एका रिपोर्टनुसार, अवंतिकाने आपलं मुंबईच्या पालीमधील घर सोडलं आहे. आता ती आपल्या कुटुंबियांसोबत रहात आहे. यानंतर अवंतिकाच्या आईने म्हटले होते की, “दोघांमध्ये काहीच ठिक नाही. काही मतभेद आहे ज्याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला आहे. इम्रानपासून वेगळं राहायला लागल्यानंतर अवंतिकाने आपल्या नावातून खान हटवले आहे.

दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर इम्रान खानने 2011 साली अवंतिकासोबत लग्नगाठ बांधली होती. 2008 मध्ये आलेल्या जाने तू या जाने ना या सिनेमातून इम्रानने आपल्या करिअरला सुरुवात केली होती.