भारत-पाक क्रिकेट सामना सुरू होण्यापुर्वीच पाकिस्तानची ‘नांगी’, पंतप्रधान इम्रान खान यांनी केले ‘ट्विट’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – इंग्लंडमध्ये सुरु असणाऱ्या विश्वचषकातील रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. भारतीय संघही दमदार कामगिरी करत आहे. त्यात भारत- पाकिस्तान क्रिकेट सामना होणार आहे. भारत- पाकिस्तान सामना बोललले तर फक्त भारत पाकिस्तानमध्येच नाहीतर जगात कोठेही असणार भारतीय पाकिस्तानी व्यक्ती हा समाना आतुरतेने आणि उत्साहाने पाहतो. आज भारत आणि पाकिस्तानमध्ये चर्चा आहे ती फक्त भारत-पाकिस्तान सामन्याची. हा सामना मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानवर होणार आहे.

भारत पाकिस्तान सामन्यासाठी खेळाडूंसह दोन्ही देशातील चाहत्यांनी जय्यत तयारी केली आहे. तर या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावरही चाहत्यांची तुडुंब गर्दी दिसणार आहे. मात्र मागिल काही दिवसांपासून इंग्लंडमधील वातावरण हे क्रिकेटसाठी अनुकुल नाहीये, त्यामुळे भारत-पाकिस्तान समान्यावर पावसाचे सावट होते. मात्र सकाळी सुर्याने दर्शन दिलं आहे. त्यामुळे सामन्याल सुरुवात होईल.

भारत पाकिस्तानच्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यात येत आहेत. तर अनेक देवाकडे प्रार्थना करत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे एकेकाळी पाकिस्तान संघाचे कर्णधार होते. त्यामुळे त्यांची क्रिकेटप्रती निष्ठा आहे. त्यामुळे त्यांनी पाकिस्तानी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच सामन्याचा जो निकाल येईल तो स्वीकार करण्याचा सल्ला त्यांनी खेळाडूंना दिला आहे. तसंच शेवटच्या चेंडू पर्यंत लढण्याची जिद्द ठेवा, हा कानमंत्र दिला आहे.

दरम्यान, विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तान सामने सहावेळा झाले आहेत. प्रत्येक वेळी भारत पाकिस्तानच्या वरचढ ठऱला आहे. त्यामुळे या समान्यातही भारतच विययी होईल, असा करोडो भारतीयांचा विश्वास आहे.

सिने जगत –

‘या’ टॉप ५ अभिनेत्रींचा चेहरा खुपच ‘भोळा’, ‘ती’ अभिनेत्री बॉलिवूडमध्ये नंबर २ वर, पहा सर्व फोटो

आजही ‘या’ अभिनेत्याला मुलं घालतात लग्‍नाची मागणी, येतात अश्‍लील मेसेज्स

‘त्या’ कपड्यांवर मलायका अरोरा पुन्हा एकदा हॉस्पीटल ‘समोर’च दिसली, चाहत्यांमध्ये ‘नरम-गरम’ चर्चा

‘या’ 4 ‘टॉप’ अभिनेत्रींनी केलं ‘डेटिंग’, मात्र अद्यापही आहेत अविवाहीत

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like