PM इम्रान खानच्या दहशतवादी अजेंडयाचा ‘पर्दाफाश’, हाफिज सईद सोबतचे ‘पोस्टर’ सर्वत्र झळकले

लाहोर : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान कितीही दहशतवादाविरोधी असल्याचे दाखवत आहेत मात्र सोशल मीडियामुळे त्यांचे जगभरात पितळ उघडे आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदसोबत त्यांचे पोस्टर लाहोरमध्ये लागले आहेत. पाकिस्तानी पत्रकारांनीच या पोस्टरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून इमरान खानवर सवाल उपस्थित केले आहेत. हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या पोस्टरमध्ये दहशतवादी हाफिज सईद बरोबर इमरान खानसह अनेकांचे फोटो आहेत. पोस्टरमध्ये प्रत्येकाची नावे उर्दूमध्ये लिहिलेली असून ‘जश्न-ए-आझादी’ हे उर्दू भाषेतही लिहिलेले आहे.

आपण दहशतवादापासून मुक्ती मिळवू इच्छित असल्याचे सांगत इमरान खान जगभर फिरत आहे. मात्र या पोस्टरमुळे इमरान खान यांच्या दाव्याची पोल उघडकीस आली आहे. याआधीही इम्रान खान सरकारने हाफिज सईदवर कारवाई करण्यासाठी नाटक केले पण त्यांच्या विरोधात प्रभावी पावले कधीच घेतली गेली नाहीत.

मुंबई दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असण्याव्यतिरिक्त हाफिज सईद आणि त्यांची संस्था जमात-उद दावा, लश्कर-ए-तैयबा यांनी भारत देशात बरीच दहशत पसरविली आहे. भारत सरकारने हाफिज सईदविरूद्ध बरेच पुरावे पाकिस्तानसमोर मांडले आहेत परंतु पाकिस्तान कोणतीही कारवाई करण्यास तयार नाही.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like