अभिनेता इमरान खान आणि अवंतिका यांच्या घटस्फोटाबाबत इमरानने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खानचा भाचा इमरान खान आजकाल आपल्या पर्सनल लाइफसाठी चर्चेत आहे. नुकतेच इमरान खान आणि त्याची पत्नी अवंतिका मलिक यांच्याबद्दल असे समजले आहे की, दोघांच्या नात्यामध्ये काही ठिक नाही. दोघेही एकमेकांपासून वेगळे होणार आहे. सोशल मिडियावर अशा बातम्यांवर इमरानला एका इव्हेंटमध्ये प्रश्न केला. याबाबतीत इमरानने अशी प्रतिक्रिया दिली.

घटस्फोटाबद्दल इमरानला प्रश्न विचारला गेला यावर इमरानने उत्तर दिले की, ‘या इव्हेंटमध्ये असे वेगवेगळे प्रश्न कसे विचारु शकता.’ इमरानला घटस्फोटाच्या प्रश्नावर राग आला नाही. याउलट उत्तर देताना इमरानचा चेहरा हसरा होता आणि तो एकदम नॉरमलपणे उत्तर देत होता.

असे समजले आहे की इमरान आणि अवंतिका या दोघांच्या नात्याला थांबविण्याचे काम त्यांचे परिवाराची लोक करत आहे. अवंतिकाने आपल्या नावाच्या पुढे इमरान खानचे आडनाव हटविले आहे. यामुळे त्यांच्या नात्यामधील भिंत अजून कच्ची होताना दिसत आहे.

इमरान आणि अवंतिका २०११ मध्ये लग्नाच्या बेडीत अडकले होते. याआधी त्या दोघांनी एकमेकांना डेट केले होते. इमरानने ‘जाने तू या जाने ना’, ‘मेरे ब्रदर की दुल्हन’, ‘डेली बेली’ और ‘मटरू की बिजली का मंडोला’ अशा अनेक चित्रपटात काम केले आहे. तो शेवटी ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटात दिसून आला. या चित्रपटात कंगना रणौतने मुख्य भूमिका साकारली होती.